
जव्हार : राज्यभरात लम्पी (Lumpy Skin) हा विषाणूजन्य आजार बळावत असल्याने जनावरांची लसीकरण (Lumpy Vaccination) मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार तालुक्यातील ४२,७४१ पैकी २७,८८८ जनावरांचे तालुका पशुसंवर्धन विभागामार्फत (Animal Husbandry Department) लसीकरण करण्यात आले आहे.
लम्पीवर विशेष प्रतिबंधात्मक लस अद्यापपर्यंत उपलब्ध नसल्याने शेळ्यांवरील देवी रोगाच्या प्रतिबंधासाठी असलेली गोट पॉक्स ही लस या आजाराला नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येत असून ती अतिशय प्रभावी ठरत आहे, असे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले.
लम्पीवर स्वतंत्र लस निर्माण झाली नाही. मात्र, शेळ्यांमध्ये देवी रोगावर वापरण्यात येणारी गोट पॉक्स लस लम्पीवर प्रभावी ठरत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाकडून इतर जनावरांनाही ही लस दिली जात आहे.
गोट पॉक्स लस दिल्यानंतर २१ ते २८ दिवसांनी पशूंमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण होते. असे असले तरी पशुपालकांनी जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन तालुका पशुसंवर्धन विभागाने केले.
शेळ्यांमधील देवी रोगाचे विषाणू आणि लम्पी आजारावरील विषाणू जवळपास सारखेच आहेत. त्यामुळे शेळ्यांसाठी वापरण्यात येणारी गोट पॉक्स लस ही लम्पीविरोधातही प्रभावी ठरत आहे.
- डॉ. जयकुमार सातव, पशुसंवर्धन अधिकारी, वाळवंडा
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.