Animal Advisory : शेतकऱ्यांना हवामानावर आधारित पशू सल्ला

Animal Husbandry : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे’ ‘फुले अमृतकाळ या तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशू सल्ला ॲप’ ला सुरवात करण्यात आली आहे.
Animal Advisory
Animal AdvisoryAgrowon

Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे’ ‘फुले अमृतकाळ या तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशू सल्ला ॲप’ ला सुरवात करण्यात आली आहे. यामुळे आता विद्यापीठ हवामानावर आधारित शेतकऱ्यांना पशू सल्ला देणार आहे.

शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ऋतूतील, विशेषतः उन्हाळ्यातील, जास्त तापमानाचा गाई आणि म्हशींवर येणारा ताण समजण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले अमृतकाळ हे अॅप सुरू केले आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या अॅपची सुरवात झाली.

Animal Advisory
Animal Care : दुधाळ गायी, म्हशीला कसा आहार द्याल?

कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब आसबे, राज्याचे अपर कृषी सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, देशी गाय संवर्धन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ सोमनाथ माने, सहयोगी अधिष्ठाता, डॉ. सुनील मासळकर, तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कंखरे, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके, डॉ. संतोष मोरे, तंत्रज्ञ अभयसिंह जगताप, श्रीकृष्ण मुळे उपस्थित होते.

Animal Advisory
Animal Care : प्लास्टिक खाणं जनावरांसाठी ठरेल जीवघेणं

सेन्सर्सच्या मदतीने जगभरातील कुठल्याही स्थळाचे तापमान आद्रता निर्देशांकाची माहिती मिळवता येते. जास्त-कमी तापमान निर्देशांक असल्यास जनावरांची घ्यावयाची काळजी, सल्ला लगेचच मिळणार आहे.

बदलत्या वातावरणामुळे जनावरांवरील येणारा ताण व त्यामुळे कमी होणारे दूध उत्पादन या ‘ॲप’द्वारे दिले गेलेले सल्ले वेळीच अमलात आणून रोखता येईल. जनावरांना होणाऱ्या उष्माघातामुळे दूध उत्पादनात होणारी मोठी घट या ॲपच्या वापरामुळे कमी होण्यास मदत होईल.

वातावरणीय बदलामुळे पावसाने दिलेली ओढ, अतिवृष्टी, ढगफुटी, वाढते तापमान, उष्माघात व पावसाचा लहरीपणा अशा गोष्टी वारंवार घडत आहेत. त्यामुळे पशुधनास चारा व पाणी पुरविण्यावर आणि पशुधनाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.

संकरित गाई व म्हशींच्या दुग्ध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. दुभत्या गाईचे दूध उत्पादन ५ ते २० टक्क्यांपर्यंत घटल्याचे आढळून आले आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी हे ॲप महत्त्वाची भूमिका बजावेल, असे या वेळी सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com