Animal Care : प्लास्टिक खाणं जनावरांसाठी ठरेल जीवघेणं

Mahesh Gaikwad

जनावरांचा आहार

बऱ्याचदा पशुपालक जनावरांना उघड्यावर चरण्यासाठी सोडतात. अशावेळी जनावरे मिळेल ते अखाद्य पदार्थ विशेषत: प्लास्टिक खातात.

Animal Care | Agrowon

प्लास्टिक खाण्याचे प्रमाण

शेळी-मेंढ्यांच्या तुलनेत गायी-म्हशींमध्ये प्लास्टिक खाण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे जनवारांच्या पोटात प्लास्टिक साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते.

Animal Care | Agrowon

पोटफुगीची समस्या

पोटात साचलेल्या प्लास्टिकमुळे जनावरांना रवंथ करण्यात अडचणी येतात. त्यामुळे जनावरांना पोटफुगी होण्याची शक्यता असते.

Animal Care | Agrowon

प्लास्टिक खाल्लेले जनावर

प्लास्टिक खाल्लेले जनावराने ओळखणे कठीण असते. कारण प्लास्टिक किंवा अखाद्य पदार्थ जनावराच्या पोटात साचून राहतात.

Animal Care | Agrowon

दूध उत्पादनात घट

पोटात साचलेल्या प्लास्टिकमुळे जनावरांला पोटात कळा येण्याचा त्रास सुरू होतो. जनावर चारा-पाणी खाणे कमी करते. तसेच दूध उत्पादनातही घट दिसून येते.

Animal Care | Agrowon

पचनक्रिया मंदावते

जनावराच्या पोटात साचलेल्या प्लास्टिकमुळे पोटाची आकुंचन क्रिया मंदावते. त्यामुळे पचनक्रिया मंदावून पोटात वायू जमा होवून अपचन होते.

Animal Care | Agrowon

शस्त्रक्रिया एकमेव उपचार

शस्त्रक्रिया करून जनावराने खाल्लेले प्लास्टिक कोठीपोटातून बाहेर काढणे हा यावरील एकमेव उपचार आहे.

Animal Care | Agrowon
Animal Care | Agrowon