Lumpy Skin : लातूर जिल्ह्यात बारा गावांत ‘लम्पी’चा प्रादुर्भाव

Lumpy Outbreak Latur : जिल्ह्यात गोवर्गीय पशुधनात लम्पी स्किन प्रादुर्भाव आढळून आला असून आतापर्यंत चार तालुक्यातील बारा गावांमध्ये ४७ बाधित गोवर्गीय जनावरांची नोंद झाली आहे.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon
Published on
Updated on

Latur News : जिल्ह्यात गोवर्गीय पशुधनात लम्पी स्किन प्रादुर्भाव आढळून आला असून आतापर्यंत चार तालुक्यातील बारा गावांमध्ये ४७ बाधित गोवर्गीय जनावरांची नोंद झाली आहे. जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने तातडीने हालचाली करुन शीघ्र कृती दलाची स्थापना केली आहे.

जिल्ह्यातील सर्व १३२ पशू चिकित्सालये व तीन फिरते पशू चिकित्सालय आदी पशुवैद्यकीय संस्थांना शासनाच्या मानक कार्यपद्धतीनुसार विलगीकरण, औषधोपचार, बाह्यपरोपजीवी नियंत्रण आणि डिसइन्फेक्शनबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी दिली.

जिल्ह्यातील गोवर्गीय पशुधनासाठी एक लाख ७६ हजार पाचशे लसी प्राप्त झाल्या असून त्यापैकी एक लाख ५९ हजार पाचशे लसीचा वापर झाला आहेत. सध्या १७ हजार लसी शिल्लक असून त्या तातडीने पशुपालकांच्या जनावरांना देण्याचे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले आहे. जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून दैनंदिन आजाराची माहिती गोळा केली जात आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease : ‘लम्पी’चा विळखा वाढतोय

बाधित व शेजारील गावांत गोचीड, माश्या आणि इतर बाह्य परोपजीवींचे नियंत्रण करण्यासाठी औषधांची फवारणी व विशेष उपाययोजना केली जात आहे. प्रत्येक बाधित गावात तत्काळ पोहोचून तपासणी, उपचार, नमुने गोळा करणे व विलगीकरणाच्या सूचना दिल्या आहेत.

पशुपालकांनी जनावरांमध्ये त्वचेवर गाठी, ताप, भूक मंदावणे आदी लक्षणे आढळून आल्यास तातडीने पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा तसेच सतर्क राहून आपला गोठा स्वच्छ ठेवावा. बाह्य परोपजीवी नियंत्रणासाठी आवश्यक औषधांची फवारणी करावी. जर पशुरुग्ण आढळून आला तर तत्काळ जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी केले आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : नांदेड जिल्ह्यातील चौदा गावांत ‘लम्पी’चा प्रादुर्भाव

बाधित गावे

अहमदपूर तालुक्यातील वरवंटी, धसवाडी, कोंडगाव, ब्रम्हपुरी, शिंदगी या गावांत २६ जनावरांना लम्पीची बाधा झाली असून त्यातील पाच बरे, १९ वर उपचार सुरू तर दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. लातूर तालुक्यातील बोरवटी, खुलगापूर, सलगरा गावांत तीनरुग्णांपैकी २ बरे, एकावर उपचार सुरू आहेत.

उदगीर तालुक्यातील हेर, डोंगरशेळकी, देवर्जन गावांत सात बाधितपैकी तीन बरे, ४ वर उपचार सुरू आहेत. देवणी तालुक्यातील अंबानगर गोशाळातील ११ बाधित जनावरांवर उपचार सुरू असून काही बरे झाले आहेत. चार तालुक्यातील १२ गावांतील ४७ बाधित बाधित जनावरांपैकी १० जनावरे पूर्ण बरी झाली असून २ जनावरांचा मृत्यू, उर्वरितांवर उपचार सुरू असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com