Animal Care : जनावरांच्या मृतदेह विल्हेवाटीसाठी आता शुल्क आकारणी

महापालिका हद्दीमध्ये मृत झालेल्या जनावरांचा मृतदेह हलविणे किंवा विल्हेवाट लावण्यासाठी आता शुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Animal care
Animal careAgrowon
Published on
Updated on

नाशिक : महापालिका हद्दीमध्ये मृत झालेल्या जनावरांचा (Dead Animal) मृतदेह हलविणे किंवा विल्हेवाट लावण्यासाठी आता शुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात महासभेत प्रस्ताव सादर करण्यात आला असून, एक हजार रुपयांपर्यंत आकारणी केली जाणार आहे.

Animal care
Animal Care : जनावरांतील घातक परजीवी : गोचीड

स्थानिक स्वराज्य संस्था नियमांमध्ये महापालिकांसाठी अठरा प्रकारच्या स्वच्छताविषयक तरतुदी आहेत. त्यात जनावरांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे किंवा जनावरांचा मृतदेह हलविणे हे महानगरपालिकेच्या कर्तव्यात समाविष्ट आहे. महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत ही कामे केली जातात; मात्र, सद्यःस्थितीत शहरातील कोणत्याही व्यक्तीकडून शुल्क आकारले जात नाही.

Animal care
Animal Care : सदोष चाऱ्यामुळे जनावरांना होणारे आजार

मोकाट व भटकी जनावरे मृत झाल्यास किंवा मृत जनावरे उचलण्यासाठी जनावरांच्या मालकांना शुल्क अदा करणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत महापालिका क्षेत्रात खत प्रकल्प येथील दाहिनीमध्ये जनावरांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते. त्यापूर्वी जनावरांचा मृतदेह हलविण्यासाठी प्रक्रिया आहे.

महापालिकेच्या सहा विभागांत मोकाट भटके, तसेच पाळीव प्राणी गोठ्यातील मृत जनावरे उचलणे व विल्हेवाट लावण्यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्याने त्या अनुषंगाने शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका हद्दीतील रस्त्यावरील मोकाट किंवा भटकी जनावरे मृत आढळून आल्यास त्यावर शुल्क आकारले जाणार नाही.

हजारांपर्यंत शुल्क आकारणी

कुत्रा, मांजर, बोकड, शेळी, वासरू यासारखी लहान जनावरांसाठी प्रति जनावर तीनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. गाय, म्हैस, गोरा, बैल, रेडा, घोडा, गाढव व इतर मोठ्या जनावरांसाठी एक हजार रुपये प्रतिजनावर असे शुल्क आकारले जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com