
Baramati APMC : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने शिर्सुफळ ग्रामपंचायतीची मागणी विचारात घेऊन शिर्सुफळ येथे नव्याने शेळी-मेंढी बाजाराचा प्रारंभ बाजार समितीचे सभापती विश्वासराव आटोळे व सरपंच जुई हिवरकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २८) करण्यात आला. पहिल्या दिवशी ४५ शेळी मेंढीची आवक झाली, तर २० मेंढ्याची विक्री होऊन साधारण लाखाचे आसपास उलाढाल झाली.
शेतकरी बाळू किसन हिवरकर यांच्या मेंढ्यास १८ हजार रुपये दर मिळाला. तर विनोद गुळुमकर यांनी खरेदी केला. बाळू हिवरकर, महादेव म्हेत्रे, माणिक कांबळे या शेतकऱ्यांनी शेळी मेंढी विक्रीसाठी आणल्या होत्या. बारामती बाजार समितीने राबविलेला हा स्तुत्य उपक्रम असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली सूचना व ग्रामपंचायतीच्या अनुमतीमुळे गावाचे विकासात भर पडणार आहे.
यापूर्वी शिर्सुफळ परिसरातील शेतकरी शेळी मेंढी विक्रीसाठी यवत, भिगवण, काष्टी या ठिकाणी जात होते. त्यांची सोय बारामती तालुक्यात व्हावी या उद्देशाने खरेदी- विक्री सुरू केला, असल्याचे सभापती आटोळे म्हणाले. जुई हिवरकर म्हणाल्या, की समितीने सुरू केलेल्या बाजारामुळे गावातील व परिसरातील शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे.
भविष्यात शिर्सुफळ गावात बाजार समितीचा पेट्रोल पंप असावा, अशी मागणी केली. त्यामुळे परिसरातील लोकांची व शेतकऱ्यांची सोय होईल, असे त्यांनी या वेळी सांगितले. यापुढे प्रत्येक शुक्रवारी शेळी-मेंढी बाजार सुरू राहील, भविष्यात बाजारात विविध सुविधा पुरविल्या जातील, असे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.
या वेळी उपसरपंच हिरा झगडे, दूध संघाचे माजी उपाध्यक्ष शिवाजी झगडे, बाजार समितीचे उपसभापती रामचंद्र खलारे, माजी सभापती अनिल शिवरकर, बाजार समितीचे सदस्य बापूराव कोकरे, सतीश जगताप, संतोष आटोळे, अरुण सकट, दिलीप परकाळे, विलास कदम, अतुल शिवरकर, गणेश सातपुते, सोमनाथ हिवरकर, विजय शिंदे, अप्पासाहेब झगडे, पोपट धवडे, सूरज हिवरका उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश हिवरकर यांनी केले, माजी उपसरपंच सदाशिव आटोळे यांनी आभार मारले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.