Livestock Market : उन्हाळा सुरू होताच पशुधनाची वाढली विक्री

Cattle Market : तालुक्यातील किनगाव हे गाव लातूरसह बीड, परभणी, नांदेड जिल्ह्याच्या सीमा लगत आहे. या ठिकाणी दर बुधवारी भाजीपाल्याचा व जनावराचा बाजार भरतो.
Livestock Market
Livestock marketAgrowon
Published on
Updated on

Latur News : तालुक्यातील किनगाव येथे जनावराच्या खरेदी विक्रीचा बाजार मोठ्या प्रमाणात होतो. लाखावर किमती असलेल्या जनावराच्या खरेदी विक्रीतून कोट्यवधीची उलाढाल होत आहे.

दरम्यान, उन्हाळा लागताच शेतकरी, पशूपालकांकडून पशुधनाची विक्री सुरू झाल्याचे चित्र आहे. तालुक्यातील किनगाव हे गाव लातूरसह बीड, परभणी, नांदेड जिल्ह्याच्या सीमा लगत आहे. या ठिकाणी दर बुधवारी भाजीपाल्याचा व जनावराचा बाजार भरतो. बाजारात जनावराच्या खरेदी विक्री हे मोठ्या प्रमाणात होत आहेत.

Livestock Market
Livestock Market : खानदेशचा पशुधन बाजार: निमारी, माळवी जातींचा ऐतिहासिक ठेवा

दरम्यान, बुधवारी (ता. १९ ) आठवडे बाजारात एक लाख २५ हजार रुपयांपर्यंतच्या म्हैस विक्रीसाठी आल्या होत्या. आठवडी बाजारात बैल, म्हैस, शेळी, बकरा अशा जनावराच्या खरेदी व विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.

Livestock Market
Livestock Market: जनावरांच्या बाजाराची दैना

महाराष्ट्रासह कर्नाटकातून जनावरे खरेदी-विक्रीसाठी व्यापारी व खरेदीदार येत आहेत. दुभत्या जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवरून किंमत ठरत असून ५० हजार ते एक लाख २५ हजारपर्यंत दुभती जनावरे विकली आहेत.

सजावट करून आणतात पशुधन

किनगावच्या आठवडे बाजारात अनेक पशुपालक, शेतकरी पशुधन सजावट करून आणतात. जनावरांना घुंगर पट्टा, पैंजणासह आकर्षक बनवून विक्रीसाठी आणले जाते. जनावराची खरेदी विक्री होत असताना त्याची शरीर यष्टी, दात रचना, चाल, नख्या या बाबी तपासून खरेदी-विक्री होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com