Lumpy Skin : सोलापुरात ‘लम्पी’चा वाढता विळखा

सलग दुसऱ्यादिवशी शनिवारी (ता.१) तीन गाई आणि एक वासरु मरण पावले. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात दोनच दिवसात आठ जनावरे दगावल्याची घटना घडली.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात लम्पी स्कीनच्या आजाराने (Lumpy Skin Disease) शुक्रवारी (ता. ३०) चार गाईचा मृत्यू (Cow Death) झाल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा सलग दुसऱ्यादिवशी शनिवारी (ता.१) तीन गाई आणि एक वासरु मरण पावले. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात दोनच दिवसात आठ जनावरे दगावल्याची घटना घडली. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin Vaccination : सातारा जिल्ह्यात जनावरांचे लसीकरण ९८ टक्के

पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार, सांगोला तालुक्यातील वाढेगाव,मिसाळवाडी आणि धायटी येथील प्रत्येकी एक तर तालुक्यातील कचरेवाडीयेतील एका गाईचा शुक्रवारी (ता.३०) मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशीशनिवारी (ता.१) करमाळा तालुक्यातील करमाळा शहर येथे

Lumpy Skin Disease
Lumpy Skin Vaccination : जळगावात पशुधनाचे १०० टक्के लसीकरण

एक खिलार गाय,तसेच दिवेगव्हाण आणि राजुरी येथील प्रत्येकी एक गाईची वासरे तरमाळशिरस तालुक्यातील बांगरडे येथील एका गाईच्या वासराचा मृत्यू झाला.अलीकडच्या काही दिवसात जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढतो आहे.अक्लकोट वगळता

Lumpy Skin Disease
Lumpy Vaccination : लसीकरण झालेल्या जनावरांनाच प्रवेश

जिल्ह्यातील जवळपास दहा तालुक्यात त्याचा प्रादुर्भावआहे. मुख्यतः यात जनावरांना आजाराच्या बाधेसह मृत्यूमुखी पडणाऱ्याजनावरांची संख्याही वाढते आहे. आतापर्यंत २१ जनावरांचा मृत्यू झाला आहे.यामध्ये अकरा गायी, गाईची तीन वासरे आणि सात बैलांचा समावेश आहे.

१४४ जनावरे बरी, २७६ जनावरांवर उपचार सुरु जिल्ह्यातील दहा तालुक्यातील ४६ गावातील जवळपास ४४१ जनावरांनालम्पीची बाधा झाली आहे. या दहाही तालुक्यातील ४६ गावांच्या बाधितक्षेत्रातील १ लाख ६८ हजार १७० जनावरांचे लसीकरण या

आधीच करण्यात आले आहे. त्याशिवाय बाधित क्षेत्राबाहेरील सुमारे २ लाख ९४ हजार ६५जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. सरकारी आणि खासगी या दोन्हीक्षेत्रात आतापर्यंत एकूण ५ लाख ३० हजार १४३ जनावरांचे लसीकरणकऱण्यात आले आहे.

तर १४४ जनावरे या आजारातून बरीही झाली आहेत.सध्या २७६ जनावरांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती पशुसंवर्धनविभागाने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com