Lumpy Skin : सात जिल्ह्यांत मृत जनावरांच्या संख्येने ओलांडली शंभरी

मराठवाड्यात सर्वाधिक मृत्यू औरंगाबादमध्ये
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सात जिल्ह्यांत लम्पी स्कीन रोगाने (Lumpy Skin Disease) जनावरांना आपल्या विळख्यात घेतले आहे. रविवारपर्यंत (ता. २) या सातही जिल्ह्यांत जवळपास १०३ जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये सर्वाधिक मृत्यू झालेल्या जनावरांची संख्या औरंगाबाद (Aurangabad Lumpy Skin) जिल्ह्यात आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : सात जिल्ह्यात शंभर जनावरांचा मृत्यू

मराठवाड्यात लातूरमध्ये १५, औरंगाबाद ४८, बीड ६, जालना जिल्ह्यात १२, उस्मानाबाद ३, नांदेड १७, हिंगोली १, लम्पी स्कीन रोगाबरोबरच गोठ्यातील स्वच्छतेचा प्रश्न, सकस आहाराची कमतरता, शरीरातील हिमोग्लोबिन कमी करणाऱ्या इतर आजारांची झालेली लागण आदींमुळे जनावरांचा मृत्यू होत असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली.

Lumpy Skin
Lumpy Skin : सोलापुरात ‘लम्पी’चा वाढता विळखा

राज्यात २ ऑक्टोबरअखेर एकूण १७४८ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. उपचाराने जनावरे बरे होत असली तरी आजारी जनावरांपैकी मृत्यू होणाऱ्या जनावरांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या चिंता वाढवते आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या जनावरांची स्वच्छता राखण्यासोबतच त्यांना सकस खाद्य देण्यावर विशेष भर देण्याची गरज असल्याचेही पशुवैद्यकांचे म्हणणे आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin Vaccination : सातारा जिल्ह्यात जनावरांचे लसीकरण ९८ टक्के

औरंगाबाद मध्ये ४८ मृत्यू

लम्पी स्कीन रोगामुळे मराठवाड्यात सर्वाधिक ४८ जनावरांचा मृत्यू औरंगाबाद जिल्ह्यात झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात बाधित जनावरांची संख्या ९१४ आहे. त्यापैकी ५७६ जनावरे उपचाराने बरी झाली असून २७८ बाधित जनावरांवर सद्यःस्थितीत उपचार सुरू आहेत.

त्यामध्ये सिल्लोडमधील ७५, सोयगावमधील ६३, पैठणमधील ४२, कन्नडमधील ४७, फुलंब्रीतील ७, गंगापूरमधील ८, वैजापूरमधील ५ व खुलताबादमधील ७ जनावरांचा समावेश असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

औरंगाबादमध्ये ८३ टक्के लसीकरण

औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण ५ लाख ३५ हजार गोवर्गीय जनावरांपैकी ४ लाख ४१ हजार ४४१ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये विविध सामाजिक संस्थांचेही योगदान लाभले आहे. जिल्ह्याला सुरुवातीला शासनाकडून तीन लाख ९५ हजार लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

आता पुन्हा नव्याने एक लाख ५० हजार लस मात्रांची मागणी करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत आवश्यक लस उपलब्ध होतील, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com