Poultry Farming  Agrowon
यशोगाथा

Poultry Farming Success : कष्ट करण्याची जिद्द हवी, नोकरीपेक्षा शेतीच बरी

Integrated Farming Method : नाशिक जिल्ह्यातील कहांडळवाडी (ता.सिन्नर) येथील वाघ कुटुंबातील पंकज, अंकुश व स्वप्नील या तिघा भावंडांनी शेती अधिक दुग्ध व पोल्ट्री हे पूरक व्यवसाय अशी एकात्मिक पद्धतीची शेती जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलली आहे.

मुकूंद पिंगळे

Rural Entrepreneurs Success Story : नाशिक जिल्ह्यातील कहांडळवाडी (ता. सिन्नर) येथील वाघ कुटुंबाची शेती व पूरक व्यवसाय यांची संपूर्ण मदार कुटुंबातील युवा चुलत बंधूंनी आपल्या खांद्यावर यशस्वी पेलली आहे. संपूर्ण कुटुंबाला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. यातील पंकज व अंकुश हे दोघे सख्खे (वडील गोरक्षनाथ) तर स्वप्नील व वैभव (वडील विठोबा) हे देखील दोघे सख्खे भाऊ आहेत.

सिन्नर हा दुष्काळी तालुका आहे. सुमारे ४५ वर्षांपूर्वी वाघ भावंडांचे आजोबा लक्ष्मण भागूजी वाघ यांनी चार गाईंपासून दुग्धव्यवसाय सुरू केला. विठोबा व गोरक्षनाथ यांनी तो सांभाळला. सन २००५ मध्ये ब्रॉयलर कुक्कुटपालन सुरु केले. पूरक व्यवसायांमध्ये वाटचाल सुरू असताना शेतीकडेही दुर्लक्ष केले नाही. सन २००७ मध्ये डाळिंब लागवड केली.

तिसऱ्या पिढीकडे शेतीची जबाबदारी

मागील १० वर्षांपासून नव्या पिढीतील पंकज, अंकुश, स्वप्नील हे तरुण वडिलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नवे विचार व आधुनिक तंत्रज्ञानाने शेतीत रमले आहेत. वैभव नोकरीत व्यस्त आहेत. चार गाईंपासून सुरू झालेला दुग्धव्यवसाय आज तीस गाईंपर्यंत (एचएफ) पोचला आहे.

गोसंगोपन, चारा- पाणी, आरोग्य व्यवस्थापन, दूध काढणी अशा सर्वच कामांमध्ये तरुणाईचा सक्रिय सहभाग असतो. स्वतः राबण्यावर त्यांचा विश्‍वास आहे. मिल्किंग मशिनचा वापर, मुरघास निर्मिती आदी सुविधा आहेत. दररोज सरासरी २०० लिटर दूध संकलन होते. परिसरातील कंपनीला दुधाचा पुरवठा होतो. फॅट व एसएनएफनुसार ३३ रुपये प्रति लिटर दर मिळतो.

कुक्कुटपालनाने आलेख उंचावला

सन २००५ च्या सुमारास पाचहजार पक्षांचा ब्रॉयलर पोल्ट्री फार्म सुरू होता. दहा वर्षे करार पद्धतीने तो चालला. पंकज व अंकुश त्यांच्याकडे जबाबदारी आल्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी लेयर फार्म (अंडी) फार्म सुरू केला. त्यावेळच्या ३३०० पक्षांच्या फार्मचा विस्तार आज १२ हजार पक्षी क्षमतेपर्यंत पोचला आहे.

स्वतंत्र फीडमिल, स्वयंचलित खाद्य वितरण व्यवस्था तसेच आधुनिकता व अन्य यांत्रिकीकरण करून मजुरी व खर्चात बचत केली. प्रयोगशील पोल्ट्री उत्पादकांकडे भेटी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन व्यवसायात सुधारणा केल्या. परिसर स्वच्छता, आरोग्य जैवसुरक्षेवर अधिक भर दिला. दररोज सरासरी ११ हजारांच्या आसपास अंडी उत्पादन क्षमता आहे. सिन्नर, नाशिक, मुंबई आदी ठिकाणच्या व्यापाऱ्यांना पुरवठा होतो. वर्षभरात प्रति नग पाच रुपयांच्या आसपास दर मिळतो.

शेतीतच करिअर करण्याची खूणगाठ

स्वप्निलने कोइमतूर (तमिळनाडू) येथील विद्यापीठातून ’पोल्ट्री प्रॉडक्शन पदवी मिळवली आहे. सोबत पोल्ट्रीची जबाबदारी अंकुशही सांभाळतो.

फूलशेतीची आर्थिक जोड

घरी तीन शेळ्या आहेत. चार वर्षापासून दहा गुंठ्यात शेवंतीची शेती होते. मांजरा नदीपात्रात पाणी आले की ते शेतीत घुसते. त्यामुळे वर्षातून कधी एक तर कधी दोन हंगामच मिळतात. पृथ्वीराज लातूरला नेऊन स्वतः फुलांची विक्री देखील करतो.

त्यातून चांगले उत्पन्न मिळते. लग्नसराईत फुले विक्रीसाठी उपलब्ध होतील या पद्धतीने शेतीचे नियोजन होते. रोजच्या संपर्कामुळे व्यापाऱ्यांसोबत पृथ्वीराजच्या चांगल्या ओळखी तयार झाल्या आहेत. त्याचा फायदा फुलांना चांगले दर मिळण्यासाठी होतो.

बहिण श्रद्धाचे लग्न ठरले आहे. तिचे विवाह झाला करी घराचे बांधकाम व व्यवसाय विस्ताराचे नियोजन असल्याचे पृथ्वीराज सांगतो. महिन्याला चांगले उत्पन्न मिळत असले तरी एखाद्या कंपनीत नोकरी कर असा आई वडील सल्ला देतात. मात्र शेतीतच करिअर करण्याबाबत पृथ्वीराज आग्रही आहे. मध्यंत्तरी काही महिने घरासमोरच्या रस्त्यावर वडापाव विक्रीचे दुकानही त्याने सुरु केले.

भावाचा अभिमान

बहिण श्रद्धाला आपल्या भावाच्या कष्टाचे अप्रूप वाटते. ती म्हणते माझा भाऊ स्वतःशी आणि व्यवसायाशी खूप प्रामाणिक आहे. त्यामुळे त्याला चांगले फळ मिळते. कमी वयात अनेक चांगल्या गुणांची जपणूक त्याने केली आहे. दररोज मला दुचाकीवरून महाविद्यालयात घेऊन जाताना काही घरी दुधाचा पुरवठा करण्याचे काम त्याचे सुरू असते. दूधपॅकिंगसह अन्य कामांतही मी त्याला मदत करते.

पृथ्वीराज सूर्यवंशी ८०८०२४४०५४

सध्याच्या मोबाईल व सोशल मिडियाच्या मायाजाळात अडकलेल्या तरुणांसाठी पृथ्वीराज हे उत्तम प्रेरणादायी उदाहरण आहे. पुढे जाऊन दुधापासून प्रक्रिया पदार्थ देखील तो करू शकेल. त्याच्याकडे पाहिले की शिक्षणाचा उद्देश साध्य झाल्याचे मनोमन पटते.
- डॉ. महादेव गव्हाणे, प्राचार्य, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: मक्याचा बाजार स्थिर; कापूस दर स्थिर, टोमॅटोमध्ये काहीसे चढ उतार, तर डाळिंब व केळीला चांगली मागणी कायम

Mhaisal Lift Irrigation : ‘म्हैसाळ’साठी सौरऊर्जा प्रकल्पाचा नव्या वर्षात प्रारंभ

Wildlife Crop Damage : शाहूवाडीत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, शेतीचे नुकसान

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनासाठी प्रतीक्षा कायम

Monsoon Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर

SCROLL FOR NEXT