Nashik News : जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या सप्ताहापासून हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत.तर गुरुवार(ता.४) रोजी पश्चिम पट्ट्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरला आहे.प्रामुख्याने इगतपुरी,त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यात घाटमाथ्यावर जोरदार पावसाने हजेरी लावली.त्यामुळे धरणांची पाणी पातळी वाढत असल्याने शुक्रवार(ता.५) रोजी मध्यरात्रीपासून विसर्ग वाढवण्यात येत आहे..गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. नाशिक शहर परिसरात अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू आहे. पश्चिम पट्ट्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा महसूल मंडळात मुसळधार पाऊस झाला.तर वेळुंजे, हरसुल,दहाडेवाडीसह त्रंबकेश्वर परिसरात पावसाचा जोर दिसून आला.त्यामुळे ओढे नाले पुन्हा भरून वाहू लागले आहे..पेठ तालुक्यातील पेठ,जोगमोडी,कोहोर व करंजाळी या चारही महसूल मंडळात पावसाने जोरदार हजेरी लावली. तर इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी,घोटी व धारगाव महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला.तर या तालुक्यातील वाडीवऱ्हे, नांदगाव व टाकेद या महसूल मंडळात पावसाचा जोर काहीसा कमी होता. मात्र पावसामुळे पश्चिम पट्ट्यातील सुरू असलेली शेती कामे बंद झाली आहेत..Heavy Rainfall: पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर मंडलात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका.नाशिक शहर व परिसरात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच होती.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. शहर परिसरात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी फुल शेती असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांची तोडणी देखील सुरू होती.मात्र पावसामुळे कामात व्यत्यय आला आहे. तर काही ठिकाणी पावसामुळे झेंडू,शेवंती फुलांचे नुकसान देखील झाले आहे..भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान मध्यम पाऊस तर ८ ते ९ सप्टेंबरदरम्यान तुरळक हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. .Khandesh Rainfall : अनेक तालुक्यांत १०० टक्क्यांवर पाऊस .तर शनिवार(ता.६) रोजी येलो अलर्ट देण्यात आला असून घटक क्षेत्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, देवळा,चांदवड,सिन्नर,निफाड भागात हलका ते मध्यम पाऊस झाला..धरणातून विसर्ग वाढविण्याची शक्यतापश्चिम पट्ट्यातील गंगापूर धरणातून गुरुवार(ता.४) रोजी रात्री ९ वाजता २,०३० क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे. पावसाचा जोर असल्याने विसर्गाची टप्याटप्याने वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिक महानगरपालिका परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. दारणा धरणातून २,१९६ तर मुकणे धरणातून ३६३ क्यूसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.