UPSC Success Story Agrowon
यशोगाथा

UPSC Success Story : शेतकरी कुटुंबातील विनयची ‘युपीएससी’मध्ये भरारी

UPSC Result 2024 : गावात खडतर परिस्‍थितीत राहून शिक्षण घेताना विनय सुनील पाटील या युवकाने थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेत यश मिळविले आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : गावात खडतर परिस्‍थितीत राहून शिक्षण घेताना विनय सुनील पाटील या युवकाने थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेत यश मिळविले आहे. शेतकरी कुटुंबातील विनय पाटील याने कृषी शाखेतूनच पदवी शिक्षण घेतले. तिसऱ्या प्रयत्‍नात तो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यशस्‍वी झाला आहे.

निळवंडी (ता. दिंडोरी) येथील विनयने चौथीपर्यंतचे शिक्षण दिंडोरीला जिल्‍हा परिषद शाळेत घेतले. यानंतर माध्यमिक शिक्षण तालुका पातळीवरील जनता इंग्‍लिश स्‍कूल येथून पूर्ण केले. पुढे केटीएचएम महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील शिक्षण घेतले.

तर के. के. वाघ कृषी महाविद्यालयातून बी. एस्सी (कृषी) शिक्षण पूर्ण केले. या दरम्‍यान २०१७ मध्ये दिंडोरी तालुक्‍यातील यतीश देशमुख यांनी ‘यूपीएससी’त यश मिळविले होते. त्‍यांची प्रेरणा घेत विनयनेही स्‍पर्धा परीक्षेकडे वळण्याचा निर्णय घेतला.

तयारीसाठी त्‍याने दिल्‍ली गाठली; परंतु कोरोनाचा काळ असल्‍याने तो महिना‍भरात स्‍वगृही परतला. शेतात अभ्यास करून त्‍याने तिसऱ्या प्रयत्‍नात यश मिळविले. शेतकरी असलेले वडील सुनील पाटील आणि गृहिणी आई सुचिता पाटील यांचे वेळोवेळी प्रोत्‍साहन मिळाल्‍याने यश मिळविता आल्‍याचे त्‍याने सांगितले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल मंगळवारी (ता. १६) जाहीर झाला. त्यात नाशिकच्‍या आठ उमेदवारांनी यश मिळविले आहे. विनयसह जान्‍हवी शेखर, उत्‍सव राका, सागर भामरे, प्रियांका मोहिते, आविष्कार डर्ले, कुणाल अहिरराव, प्रशांत डगळे, सूरज निकम यांनी यश मिळविले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT