
विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Nagpur News ः वडिलांच्या आत्महत्येमुळे कौटुंबिक गरजांच्या पूर्ततेसाठी मजुरी करण्याची वेळ आली. या संघर्षावर मात करीत भिवापूरच्या प्रथमेश तिजारे (Prathmesh Tijare) याने प्रशासकीय अधिकारी होण्याचा मान मिळविला आहे. प्रशासकीय सेवेत ८५ वे रॅकिंग मिळालेल्या प्रथमेशची आयएफएस (IFS) म्हणून निवड झाली आहे. तो भिवापूर तालुक्यातील पहिलाच प्रशासकीय अधिकारी ठरला आहे.
भिवापूर हा तालुका भिवापूरी मिरचीच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. या मिरचीने रंग, चव आणि आकाराच्या बाबतीत जपलेल्या वैशिष्ट्यामुळेच तिला भौगोलिक मानांकनही मिळाले आहे. देशभरातील व्यापारी येथे येऊन मिरचीचा व्यापार करतात.
त्या माध्यमातून या भागातील हजारो व्यक्तींना नखी तोडण्याचे काम मिळाले आहे. याच भिवापूरातील वॉर्ड क्र. तीन मध्ये तिजारे कुटुंबीय राहते. या कुटुंबात वडील केशव, आई शोभा, मोठा मुलगा प्रथमेश व लहान कुणाल अशा चौघांचा समावेश आहे.
प्रशांत व अभिषेकने प्राथमिक शिक्षण गावात पूर्ण केले. त्यानंतर वरोरा येथील महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातून त्याने बीएस्सी व राहुरी कृषी विद्यापीठातून एमएससी पूर्ण केले. वरोरा येथील विद्यार्थी सहाय्यक समितीने प्रशांतच्या शिक्षणाचा भार बहुतांशी उचलला.
प्रशांतला स्पर्धा परिक्षेसाठी लहान भावाने नोकरी करीत पैसे पुरविले. पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात त्याला यश आले नाही. हिंमत न हारता त्याने दिल्ली गाठत शासकीय खासगी ग्रंथालयात अभ्यास केला. अखेरीस अखिल भारतीय गुणवत्ता क्रमांक ८४ मिळवून तो केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झाला.
शेतमजूर आईच्या कष्टाचे चीज
या कुटुंबीयांची साडेआठ एकर शेती होती. त्यातील पाच एकर शेती नात्यातील सदस्याने बळकावली. त्यामुळे जेमतेम साडेतीन एकर क्षेत्रच तिजारे कुटुंबीयांच्या वाट्याला आले. दरम्यान कौटुंबिक कलहातून केशव तिजारे (वय ४५) यांनी २००० साली आत्महत्या केली. त्यावेळी प्रशांत हा अवघा पाच वर्षाचा तर लहान भाऊ दीड वर्षाचा होता.
शोभा तिजारे यांनी दोन्ही मुलांसोबत शेतमजुरीची कामे सुरु केली. हंगामात मिरची नखी काढण्याचे काम हे तिघे करीत. त्यातून आठवड्याला प्रत्येकी ६५० रुपये मिळत. याच पैशातून घरच्या गरजा भागविण्यासोबतच दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्यांनी भागविला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.