Farmer Sachin Karekar Agrowon
यशोगाथा

Turmeric Farming : युवकाने विकसित केले हळदीचे दर्जेदार वाण

Article by Rajesh Kalmbate : आबलोली (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) येथील युवा शेतकरी सचिन कारेकर यांनी कोकणातील हवामानाला पूरक असे हळदीचे एसके ४ या नावाचे वाण निवड पद्धतीने विकसित केले आहे.

राजेश कळंबटे

राजेश कळंबटे

Developed Turmeric Variety : आबलोली (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) येथील युवा शेतकरी सचिन कारेकर यांची वडिलोपार्जित आंबा, काजू, नारळ, पोफळी अशी बागायती शेती मोठ्या प्रमाणात आहे. सन १९९५ मध्ये १२ वी शिक्षणानंतर सचिन यांनी वडिलांच्या हाताखाली शेतीचे धडे घेण्यास सुरुवात केली.

सन १९९७ मध्ये त्यांना सांगली भागातील परिचयाचे शेतकरी शेंडगे काका यांच्याकडून सांगली कडप्पा हळदीचे २० ते २५ कंद मिळाले. त्या माध्यमातून हळद लागवडीत प्रवेश झाला.

नवीन वाण विकसित

प्रयोगशील व अभ्यासूवृत्तीच्या सचिन यांनी हळदीत प्रयोग सुरू केले. एक किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजन असलेले चांगले कंद बाजूला काढणे, पाच ते सहा फूट उंचीचे निरोगी झाड, पानांची अधिक उंची अशी वैशिष्ट्यपूर्ण रोपे पाहून पुनर्लागवड करणे असे सततचे प्रयत्न सुरू होते.

त्यातून सचिन यांना निवड पद्धतीने हळदीचे वाण विकसित करण्यात यश आले.त्याचे एसके ४ (फोर) असे नाव ठेवले. यात एस नावाचे आद्याक्षर असलेली चार नावे दडली आहेत. बेणे देणारे शेडगे काका, मूळ जात सांगली कडप्पा, कोकणासाठी विशेष म्हणून कोकण स्पेशल आणि स्वतः शेतकरी सचिन असे हे चार एस आहेत.

पीक व्यवस्थापन, वाण प्रसार

सचिन दहा गुंठ्यांत लागवड करतात. तीन हजार ते २५०० रोपे लागतात.

लागवड १५ जूनपर्यंत. लागवडीसाठी पन्नास टक्के ऊन आणि पन्नास टक्के सावलीचा भाग असणे अपेक्षित. दाट सावली किंवा कडकडीत ऊन लागेल अशी रेताड किंवा पाणथळ जागा निवडू नये असे सचिन सांगतात.

गिरिपुष्पाचा पाला वापरल्यामुळे तण येत नाही.

काढणीवेळी छोटा गड्डा, मातृगंध, कन्यागंध आणि हळकुंड अशी प्रतवारी. त्यातील मोठ्या वजनाचे हळकुंड बेण्यासाठी बाजूला ठेवले जाते. घरगुती स्तरावरच शिजवणी. यंत्राद्वारे पॉलिशिंग व पावडर निर्मिती. सध्या सचिन पावडर कमी तयार करतात. बेण्याचीच अधिक विक्री होते. कृषी विभागाच्या साह्याने वर्षाला एक लाखांपर्यंत रोपे तयार होत आहेत.

उत्पादन, गुणवत्ता व वाणवैशिष्ट्ये

प्रति १० गुंठ्यांत अडीच टन ओली हळद मिळते. त्यापासून पाचशे किलो पावडर तयार होते.

कोकणातील दमट वातावरणात टिकणारी जात. करपा रोगाला प्रतिकारक.

जास्त उत्पादनक्षम. प्रति झाड ३ ते ४ किलोपर्यंतही गड्डा येऊ शकतो. मात्र किमान एक किलो वजनी गड्डा अपेक्षित.

प्रति किलो ओल्या गड्ड्यापासून २०० ग्रॅम हळद पावडर मिळू शकते. (२० टक्के उतारा)

क्युरक्युमीनचे प्रमाण साडेचार ते पावणेपाच टक्के

वाणाच्या चाचण्या व प्रमाणपत्र

सचिन म्हणाले, की गुजरात येथील ‘नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन (एनआयएफ) संस्थेकडे मी वाणाची नोंदणी करण्यासाठी अर्ज केला. संस्थेकडून दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाला या वाणाच्या चाचण्या घेण्यासाठी निधी देण्यात आला.

मागील वर्षी ‘एनआयएफ’कडून सचिन यांना नवी दिल्ली येथील समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते द्वितीय पुरस्कार व प्रमाणपत्र बहाल करून सन्मानित केले आहे.

वाणाचा प्रसार

दहा वर्षांपासून सचिन वाणाचा प्रसार करतात. लागवड व्यवस्थापनाचे प्रशिक्षण ते शेतकऱ्यांना नियमित देतात. रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी या वाणाची लागवड केली आहे. गुहागर तालुक्यातील वेळंब विश्राम माळी यांनी मागील वर्षी सर्वाधिक ८ किलो ३०० ग्रॅम वजनी हळद गड्ड्याचे उत्पादन घेण्यात यश मिळवले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार व कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांनी वाण प्रसारासाठी गुहागर, संगमेश्‍वर, चिपळूण व खेड चार तालुक्यांची निवड केली आहे. वाण विकासात कृषी विस्तार अधिकारी आर. के. जाधव, गजेंद्र पौनिकर, बी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. नंदूरबार, विदर्भातील शेतकऱ्यांसह नवी दिल्ली येथील कार्यक्रमावेळीही १३ राज्यातील शेतकऱ्यांनी कंद लागवडीसाठी नेले आहेत.

विद्यापीठ करणार शिफारस

आमच्या विद्यापीठात सुमारे पाच वर्षे एसके ४ या हळदीच्या वाणाच्या चाचण्या घेण्यात आल्या

आहेत. यंदाच्या वर्षी कोकण हळदी या नावाने ॲग्रेस्को समितीत या वाणाच्या शिफारशीचा प्रस्ताव

आम्ही मांडणार आहोत. वाणाची उत्पादकता चांगली असून कुरकुमीनचे प्रमाण ४.५० टक्के आढळले आहे.

कृषी पर्यटनातून उत्पन्न साधन

कोकणातील निसर्गसौंदर्याचा उपयोग करून सचिन यांनी पाच वर्षांपासून कृषी पर्यटन व्यवसाय सुरू केला आहे. दहा ते पंधरा व्यक्तींसाठी सहा खोल्या बांधल्या आहेत. आजूबाजूला जंगल असल्याने

येथे शंभरहून अधिक प्रकारचे पक्षी आढळतात. त्यासाठी असंख्य पर्यटकांची येथे गर्दी असते.

यापूर्वी सचिन यांनी पोल्ट्री, शेळीपालन, गांडूळ खतनिर्मिती, केळी लागवड, चारसूत्री पद्धतीने भात लागवड असेही प्रयोग केले आहेत.

डॉ. प्रफुल्ल माळी, उद्यान विद्यावेत्ता, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, ९६७३१५५९९२

सचिन कारेकर, ९४२३१२९७९६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT