Mumbai News: बियाणे उद्योगात बहुराष्ट्रीय कंपन्या संशोधनासाठी नऊ टक्क्यांपर्यंत खर्च करतात, तर भारतात संधी असूनही भारतीय बियाणे उद्योग सहा ते आठ टक्के खर्च करतो. त्यामुळे आगामी काळात संशोधनावर गुंतवणूक वाढवण्याची गरज असल्याचे मत बियाणे तज्ज्ञांनी व्यक्त केले. .मुंबई इथे सुरू असलेल्या आशियाई बियाणे काँग्रेसमध्ये बियाणे तज्ज्ञ, बियाणे व्यापार तज्ज्ञ, व्यावसायिक तसेच भारत सरकारच्या वाणिज्य आणि कृषी विभागातल्या वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले..Seed Law: संसदेच्या येत्या अधिवेशनात नवीन बियाणे कायदा: शिवराजसिंह चौहान.जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू असलेल्या या सीड काँग्रेसमध्ये देशभरातील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. बियाणे उद्योगावर झालेल्या चर्चासत्रात भारतीय बियाणे उद्योगांच्या संशोधन गुंतवणुकीवर गंभीरपणे चर्चा करण्यात आली..कोणतेही पीक घेण्यासाठी लागणाऱ्या प्रमुख निविष्ठांपैकी बियाणे हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. या घटकावर संशोधन संस्था बरोबर खासगी बियाणे उद्योगालाही मोठे संशोधन करण्यासाठी पुढे यावे लागेल. भारतीय बियाणे उद्योग संशोधन करण्यासाठी सहा ते आठ टक्के गुंतवणूक करतात. त्याचवेळी बहुराष्ट्रीय कंपन्या सहा ते नऊपेक्षा जास्त गुंतवणूक करतात, अशी माहिती जागतिक सर्वेक्षणातून समोर आली आहे. .Onion Seed Production: कांदा बीजोत्पादन क्षेत्र कमी होणार खरेदीदारांकडून दरांची हमी.भारतीय बियाणे उद्योगाला भविष्यात आपले क्षेत्र आणि उद्योग विस्तारायचा असेल तर संशोधन करण्याचे प्रमाण आणि त्यातील गुंतवणूक वाढण्यावर अनेक उद्योजकांनी सहमती दर्शवली. जीएम पद्धतीच्या बियाण्यावर जगभरात संशोधन सुरू असून या तंत्राच्या बियाण्याचा वापर १९९६ पासून २०२५ पर्यंत साडेतीन पटीने वाढल्याचे निरीक्षण या वेळी नोंदवण्यात आले..भारतात १९७० मध्ये हा व्यवसाय १२ टक्के तोट्यात होता, आता मात्र २००० नंतर सात टक्क्यांनी वाढला आहे. या चर्चासत्रात नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रभाकर राव, बियोफार्मचे अवतारसिंग धिंडसा, क्लेनकरू सीड्सचे डेव्हिड मालन, ‘एफएसआयआय’चे अध्यक्ष अजय राणा तसेच अपेडाच्या मॅनेजिंग डायरेक्टर विनीता सुधांशू यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला..बियाणे उद्योगाने आपले लक्ष्य आरोबिक, डीएसआर आणि इतर तंत्राकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आयसीएआरने ४० पेक्षा जास्त हवामान अनुकूल वाण विकसित केले आहेत. बियाणे उद्योगाने आता इतर पद्धतीच्या बियाणे संशोधनाकडे वळावे.डॉ. मनीष पटेल, इकोटेक सीड्स.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.