Dairy Farming Agrowon
यशोगाथा

Dairy Business : मांजरा पट्ट्यात शिंदे यांचा प्रेरणादायी दुग्ध व्यवसाय

Dairy Farming : लातूर जिल्ह्यात मांजरा नदीकाठी शेती असलेल्या विलास शिंदे कुटुंबाने ऊसशेतीला संकरित गोसंगोपनातून दुग्धव्यवसायाची जोड दिली. कष्टांना विविध सुविधा व व्यवस्थापनाची जोड दिली.

विकास गाढवे

Success Story of Dairy Farming : ऊस उत्पादनासाठी लातूर जिल्ह्यातील मांजरा पट्ट्याची ‘ग्रीन बेल्ट’ अशी ओळख आहे. याच मांजरा नदीकाठी जमीन असलेल्या सारसा (ता. लातूर) येथील विलास वृश्षिक शिंदे केवळ ऊसशेतीवर थांबले नाहीत. दुग्ध व्यवसाय व आधुनिकतेची जोड दिली. मुरूड - अंबाजोगाई रस्त्यावर लातूर व बीड जिल्ह्याच्या सीमेवर सारसा गाव आहे.

संत गणेशनाथ महाराजांची ही पावनभूमी. आई,वडील व विलास यांच्यासह चार भाऊ असा शिंदे यांचा संयुक्त परिवार आहे. विलास वयाच्या १६ वर्षापासून शेतीत आहेत. दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरच त्यांची वडिलोपार्जित आठ एकर जमीन आहे. शेतीचा अनुभव घेत कला शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले.

दुग्धव्यवसायात वाटचाल

ऊसशेतीत वर्षभर कष्ट केल्यानंतर सुमारे १८ महिन्यांनी बील हाती पडते. मात्र दैनंदिन लहानमोठ्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पूरक व्यवसायाच्या शोधात विलास होते. दरम्यान परिसरातील ‘नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रिज’ या साखर कारखान्याच्या कर्जयोजनेतून बारा वर्षापूर्वी विलास यांनी संकरित गाय खरेदी केली.

लक्ष्मीच्या रूपाने लाभलेली ही गाय दररोज पंचवीस लिटर दूध देऊ लागली. दोन महिन्यांनी पुन्हा दुसरी गाय घेतली. आठवड्याला पैसे हाती येऊ लागले. कर्जाच्या हप्त्याची परस्पर कपात होऊनही चांगला पैसा हाती राहू लागला. मग व्यवसायाची चांगली गोडी लागली.

व्यवसायाचा विस्तार

दुग्ध व्यवसायात चांगला जम बसू लागल्यानंतर ‘नॅचरल शुगर’चे अध्यक्ष कृषीरत्न श्री. बी. बी. ठोंबरे यांनी गायीची संख्या वाढवण्याची सूचना करत आणखी पाच गायींच्या खरेदीसाठी अर्थसाह्य दिले. आजमितीला मोठ्या २० व लहान १८ अशा एकूण ३८ संकरित गायीं (एचएफ) शिंदे यांच्या गोठ्यात आहेत.

कुटुंबाला गायींचा चांगलाच लळा लागला आहे. व्यवसायातील नफा वाढवण्यासाठी आठ वर्षापासून स्वतःच दूध संकलन सुरू केले. सध्या परिसरातील शेतकऱ्यांकडून दररोज आठशे लिटरच्या आसपास तर स्वतःच्या गोठ्याद्वारे २०० ते २५० लिटरपर्यंत दूधसंकलन होते.

उंचावले अर्थकारण

दोन कंपन्यांना दूध पुरविले जाते. ‘फॅट’ व ‘एसएनएफ’ नुसार लिटरला २९ रूपये दर

मिळतो आहे. महिन्याला ४० टक्क्यांपर्यंत नफा होतो. अर्थकारण उंचावल्याने पूर्वीच्या आठ एकरांत

आठ एकरांची नवी भर घातली. कुटुंबांतील सर्वांचे शिक्षण पूर्ण झाले. विवाह समारंभ चांगले पार पडले. घराची दुरूस्ती केली. दरवर्षी ८० ट्रॉलीपर्यंत शेण उपलब्ध झाल्याने सोयाबीन, उसाला फायदा झाला. उर्वरित शेणखताची चार हजार रूपये प्रति ट्रॉली दराने विक्री होते. चाळीसपर्यंत गायींची विक्री केली. बारामती येथून आठ वर्षापूर्वी आणलेला संकरित (एचएफ) वळूही चांगले उत्पन्न मिळवून देतो. आर्थिक गरजा भागवण्यासाठी कर्ज काढण्याची गरज पडत नाही .

गोठा व्यवस्थापन

११० बाय ४० फूट आकाराचा मोठा तर वासरांसाठी दोन छोटे गोठे. खाद्य, बियाणे साठवण्यासाठी स्वतंत्र शेडस.

चोवीस गायींच्या चारा-पाण्यासाठी सोय होईल अशा ओळीने दोन पक्क्या गव्हाणी.

त्यात स्वयंचलित पाणी व्यवस्थापन. पाणी पिल्यानंतर तेवढेच पाणी पुन्हा जमा होते.

गव्हाणीच्या बाजूला मुक्त गोठा. या ठिकाणी गायी आनंदी राहतात. त्याचा दूध उत्पादनावर चांगला परिणाम होतो.

एक एकरात मका. यंदा ४० टन मुरघास तयार केला. सिमेंट क्रॉक्रींटचा ओटा करून तो सुरक्षित ठेवल्याने उंदीर व घुशींपासून बचाव झाला आहे. वीस गुंठ्यात मेथीघास. परिसरातील शेतकऱ्यांकडून होते सोयाबीन, हरभरा पेंडीची खरेदी. यंत्राच्या साह्याने कुट्टी करूनच चाऱ्याचा वापर. मुरघास व मेथीघासामुळे प्रथिने मिळून दुध उत्पादन वाढून चांगले फॅटही येते.

वेळच्यावेळी रोगांसाठी लसीकरण. आरोग्याची नियमित तपासणी. स्वतः प्राथमिक उपचार करतात. गरज पडल्यास पशुवैद्यकांची गरज घेण्यात येते.

दर्जेदार वंशाच्या गायींची पैदास करण्याचे कौशल्य विलास यांनी अवगत केले आहे. ३८ पैकी सुमारे १७ गायींची पैदास गोठ्यात झाली आहे. एका कंपनीच्या सक्षम वळूच्या कृत्रिम रेतन तंत्रज्ञानातून चार कालवडींची पैदास करण्यातही यश आले आहे.

नियोजन हेच कौशल्य

व्यवसायात नियोजन हाच कौशल्याचा भाग आहे. विलास सांगतात की प्रति गायीला दिवसाला सुमारे १३ किलो चारा लागतो. नियोजन केल्यास त्याची उपलब्धता होतो. मी, बंधू अनिल असे दोघेही दररोज राबतो. केवळ एक गडी तैनात केला आहे. यांत्रिकीकरणातून सुविधा उभारल्या आहेत. दररोज शेण काढण्याची गरज पडत नाही.

वर्षातून दोनवेळा ते जेसीबी यंत्राने काढता येते. लहानसहान गोष्टीचे चांगले नियोजन व व्यवस्थापन करून कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवण्यावर भर दिला आहे. सरकारकडून भाववाढीची अपेक्षा न करता अशा रितीने चांगला भाव पदरी पाडून घेता येतो असे शिंदे १२ वर्षांच्या र्अनुभवातून सांगतात. अनेक शेतकरी विलास यांच्या गोठ्याला भेट देऊन त्यांचे मार्गदर्शन घेतात. येत्या काळात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार असून गायीची संख्या शंभरांपर्यंत नेण्याचे नियोजन आहे.

विलास शिंदे ९९२३०१००८९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT