Jalgaon News: खानदेशात सुमारे २२ ते २५ दिवसांनंतर अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. काही भागांत जोरदार पाऊस झाला. माती वाहून जाणे, शेत खरडणे असे प्रकारही नदीकाठी, नद्यांच्या लगत झाले आहेत. पण पावसाने काहीसा दिलासाही मिळाला आहे. .खानदेशात यंदा जुलै व ऑगस्टमध्येही पावसाची तूट आहे. जुलैच्या अखेरीस पाऊस गायब झाला. कुठेही किंवा अपवाद वगळता मागील २२ ते २५ दिवसांत पाऊस झाला नाही. जूनमध्येही मध्यम पाऊस अनेक भागात होता. अनेक प्रकल्पही यामुळे यंदा रिकामे आहेत. नंदुरबारात जूनमध्ये २० टक्के पावसाची तूट होती. जळगावात जूनमध्ये सरासरीएवढा किंवा एकूण १२३ मिलिमीटर पाऊस झाला होता..Monsoon Heavy Rain: राज्यात जोरदार पावसाचा अंदाज; विदर्भ, कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता.पण जुलैमध्ये पावसाने पाठ दिल्यासारखी स्थिती होती. या महिन्यात पाऊस नसतानाच ऊनही तापत होते. पिके फुलोरा अवस्थेत असताना पावसाने दडी मारल्याने नुकसानही झाले. शेतातील वाफसा उन्हामुळे नाहीसा झाला. कोरडे वातावरण, वारा अशी स्थिती होती. .Maharashtra Rain: कोकण, घाटमाथ्यावर वाढणार पावसाचा जोर.मागील पाच ते सहा दिवस ढगाळ वातावरण व मध्येच ऊन असायचे. गोकुळाष्टमीला पाऊस येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. यात पाऊस आल्याने दिलासा मिळाला. खानदेशात नंदुरबार, धुळे व जळगावात सर्वत्र कमी व बऱ्यापैकी स्वरुपातील पाऊस झाला आहे. जळगाव, धरणगाव भागात लहान नाले प्रथमच खळखळून वाहू लागले आहेत..जोरदार पावसाने नुकसानखानदेशात शुक्रवारी (ता.१५) सायंकाळी सहानंतर अनेक भागांत तुरळक पाऊस सुरू झाला. सात ते साडेसात यादरम्यान अनेक भागात हलका पाऊस सुरू होता. तर रात्री नऊनंतर अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. अनेक भागात सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. जळगाव, चोपडा भागात गिरणा, तापी नदीकाठच्या शिवारातील जमिनी खरडून गेल्याचे प्रकारही घडले आहेत. तसेच शेतात पाण्याचा प्रवाह वाढल्याने ठिबकच्या नळ्या वाहून जाण्याचे प्रकारही झाले आहेत. मध्यरात्रीपर्यंत पाऊस सुरू होता..शुक्रवारी (ता.१४) रात्रीचा पाऊस (पाऊस मिलिमीटरमध्ये)जळगाव - ४२, चोपडा २८, धरणगाव ३२, यावल ४४. धुळे - २८, शिंदखेडा २६, शिरपूर ३२..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.