Dairy Business
Dairy Business Agrowon
यशोगाथा

Dairy Business : गुजरातच्या सीमावर्ती भागात आदिवासी महिलांची धवलक्रांती

टीम ॲग्रोवन

रतन चौधरी : सकाळ वृत्तसेवा

सुरगाणा, जि. नाशिक : गुजरातच्या सीमावर्ती (Gujarat Border Area) भागातील गोंदुणे (ता. सुरगाणा) येथील महिलांनी धवलक्रांती (Dhavalkranti) केली आहे. दररोज अडीच हजार लिटर दुधाचे संकलन (Milk Collection) केले जाते. दरमहा दहा रुपये बचतीतून सुरू झालेला दूध व्यवसाय (Dairy Business) आता वर्षाला २ कोटी ५२ लाखांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे, कसल्याही प्रकारचे शिक्षण न घेतलेल्या रणरागिणी कोटींचा व्यवहार सांभाळत आहेत.

जिवली सादुराम भोये या भगिनीने ही किमया घडवली. त्यांनी तेरा महिलांना एकत्र करत दरमहा दहा रुपयांची बचत सुरू केली. महालक्ष्मी बचत गटाची स्थापना केली. उंबरठाणच्या पंजाब नॅशनल बँकेतर्फे अडीच लाखांचे कर्ज बचत गटाला मिळवून दिले. त्यातून तेरा दुधाळ म्हशी खरेदी केल्या. कामाची शिस्त, चोख आर्थिक व्यवहार, दरमहा पाच तारखेला बैठक, प्रामाणिकपणा, स्वयंशिस्त या गुणांमुळे अडीच लाखांचे बँकेचे कर्ज अनुदानामुळे निम्म्यावर आले. उरलेल्या कर्जाची परतफेड दूध व्यवसायातून त्यांनी नऊ महिन्यांत केली.

अनेक अडचणींना तोंड देत २००८ मध्ये बिरसा मुंडा महिला दूध उत्पादक सहकारी संस्था नोंदवली आणि डेअरी सुरू केली. त्यामध्ये तेरा आदिवासी महिलांचा सहभाग असून, सर्व महिला निरक्षर आहेत. जिवली भोये, सविता गावित, पारू गावित, मोहना गांगोडा, सुकरा पवार, सविता गावित, सुशिला पवार, सीता गावित, जमू भोये, नीरू पवार, गजन भोये या महिला डेअरीचा व्यवसाय सांभाळतात. त्यांनी मनोहर भोये या दहावी शिकलेल्या तरुणाला सचिवपदी नियुक्त केले. हा तरुण आर्थिक व्यवहार पाहतो.

संकलित होणारे दूध डांग जिल्ह्यातील वघई येथील शीत केंद्रात पाठवले जाते. डेअरी दूध संकलन केंद्राची इमारत संस्थेच्या मालकीची आहे. डेअरीमध्ये सीमावर्ती भागातील गोंदणे, हडकाईचोंड, पांगारणे, केळीपाडा, या गाव-पाडा, वस्त्यांवरील दुधाचे संकलन केले जाते.

स्थलांतर पोहोचले शून्यावर

सीमावर्ती भागातील सात गावांमधील स्थलांतर शून्यावर पोहोचले. हाताला काम मिळाल्याने शैक्षणिक प्रगती साधता आली. शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झाली. राहणीमान सुधारले असून कपडे, घरातील संसारोपयोगी साहित्य, दुचाकी, चारचाकी वाहने, शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, घरात दूरचित्रवाहिनी संच अशा सुधारणा झाल्या. बँकेतील कर्जप्रकरणासाठी प्रौढ साक्षरता वर्गात रात्री धडे गिरवत त्या सही करायला शिकल्या.

अद्याप आमच्या बचत गटाची सरकारकडे नोंदणी झालेली नाही. आम्हाला महाराष्ट्र सरकारने डेअरीसाठी अनुदान व सवलती दिल्यास हा व्यवसाय आम्हाला जोमाने सुरू करता येईल.

- जिवली भोये, अध्यक्षा, बिरसा मुंडा दूध डेअरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT