Success Story
Success Story Agrowon
यशोगाथा

Success Story : तेल्हाऱ्यातील दीपिका देशमुख यांचा गृहोद्योगातील प्रेरणादायी प्रवास, राज्यात कमवले नाव

 गोपाल हागे

Rural Story : दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर प्रकाशराव देशमुख यांच्याशी लग्न झाल्यामुळे दीपिका तेल्हारा येथे आल्या. या कुटुंबाकडे शेती केवळ दीड एकर, त्यामुळे त्यांचे पती सायकल स्पेअरपार्टचे दुकान चालवत. आपले पती, सासू-सासरे यांच्यासह त्यांचे आयुष्य खरे तर ‘चूल आणि मूल’ एवढ्यापुरतेच मर्यादित.

पुढे मुलगी दिशा आठवीला अन् मुलगा सार्थक हा पाचवीत असताना प्रकाश यांचे आजारपण सुरू झाले. दीपिका यांच्यावर कुटुंबाचा भार आला.त्यांच्या वडिलांनी मानसिक बळ दिल्यामुळे स्वतःच्या सायकल स्पेअर पार्ट, दुरुस्तीची कामे सुरु केली.

यातील दीपिकांनी सायकलीचे पंक्चर, रिमआउट काढणे व सर्व कामे त्यांनी शिकून घेतली. हळूहळू आत्मविश्‍वास वाढू लागला. मात्र अतिक्रमण काढण्याच्या एका मोहिमेमध्ये अन्य दुकानासोबतच त्यांचेही दुकान काढले गेले. पुन्हा शून्यातून सुरुवात करायची वेळ आली.

‘तनिष्का’ संपर्कातून मिळाली दिशा

सायकल दुरुस्तीचे काम करतानाच दीपिका यांनी ‘सकाळ’च्या तत्कालीन ‘तनिष्का’ समन्वयक वनिता कदम यांचा फोन आला. या फोनने त्यांच्या महिला गृहोद्योगाच्या कामाला चालना मिळाली, असे त्या आवर्जून सांगतात.

सूर्योदय गृहोद्योगाची स्थापना

सुरुवातीला सायकलीच्या दुकान सुरू असताना दीपिका यांनी ‘सूर्योदय’ महिला गृहोद्योग सुरू केला. पापड, उन्हाळी वाळवण, कुरडई, वड्या तयार करत. सोबतच वेगवेगळ्या फुलांची ज्वेलरी निर्मिती व विक्री सुरू केली.

विशेषतः सूर्योदय इव्हेंट मॅनेजमेंट या नावाने डोहाळजेवणांच्या कार्यक्रमांचे व्यवस्थापन त्या करू लागल्या. ती कामे हंगामी असली तरी त्यातून उत्पन्न सुरू झाले. मात्र कोरोनाच्या काळात कार्यक्रमच बंद झाले. मग काय करायचे, तर मास्क निर्मितीमध्ये त्यांना संधी दिसली.

सुमारे ११७ महिलांना एकत्र करीत त्यांनी मास्क निर्मितीचा उपक्रम हाती घेतला. तत्कालीन महिला बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी दीपिकांना ‘मास्क वूमन’ असे संबोधले. दरम्यान पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

प्रतिदिन १० हजारांपर्यंत पाणीपुरीची विक्री होत असे. मग पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवायला सुरुवात केली. अशा छोट्या मोठ्या व्यवसायातून दोन ते अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न त्यांची हाती येते. सध्या त्यांनी एका कपडे बनविण्याच्या उद्योगात प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.

थोडे काही सुरळीत होते आहे, तोवर गेल्या वर्षी त्यांच्या पतीचे निधन झाले. मात्र तरिही स्वतःच्या मुलांना उच्चशिक्षण देण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे. इतकेच नाही तर लग्नापूर्वी केवळ दहावीपर्यंत शिकलेल्या दीपिका यांनी मुला-मुलींच्या आग्रहास्तव स्वतःही मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली. सध्या त्या मुक्त विद्यापीठातूनच एम.बी.ए. या व्यावसायिक पदवीची तयारी करीत आहेत. आजवर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

अन्य महिलांनाही फायदा

स्वतःची आर्थिक घडी बसवताच अन्य महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी दीपिका यांचे प्रयत्न सुरू असतात. सूर्योदय महिला उद्योगाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रशिक्षणातून महिलांना रोजगार उपलब्ध करण्याचे त्यांचे ध्येय आहे.

सूर्योदय महिला उद्योग हा ग्रामीण महिला वेगवेगळ्या हंगामी वस्तू तयार करतात, त्याची विक्री सूर्योदय ब्रॅण्ड अंतर्गत केली जाते. यातून महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनत आहेत. या वर्षी होळीसाठी १० महिलांसह सुमारे सहा क्विंटल नैसर्गिक रंग तयार केले होते.

संपर्क - दीपिका देशमुख ९१७५६३९००४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT