Team Agrowon
केळीसाठी प्रसिध्द असणाऱ्या खानदेशातील जळगाव प्रमाणेच धुळे जिल्ह्यातील प्रगतिशील केळी बागायतदारांनीही आपली विशेष ओळख तयार केली आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील तोंदे येथील विजय पाटील हेही त्यापैकीच एक शेतकरी.
कंत्राटी बांधकाम व्यावसायासोबतच विजय पाटील यांनी निर्यातक्षम केळी उत्पादनातही आपली ओळख निर्माण केली आहे.
शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी केवळ केळीवर अवलंबून न राहता पपईत आणि कलिंगडाचेही उत्पादन पाटील यांनी घेतले आहे.
यासाठी योग्या नियोजनासह नवे वाण, बाजारपेठ यांचा सखोल अभ्यास पाटील यांनी केला.
विशाल यांनी अभ्यासूवृत्ती जोपासली आहे. ते घेत असलेली फळपिके जोखमीची व संवेदनशील आहेत.
शेती क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मास्टर शेतकऱ्यांकडे जाऊन शिकण्याची वृत्ती त्यांनी जोपासली आहे.