Chopde Family Agrowon
यशोगाथा

Grape Industry : अठरा देशांत नाव कमावलेली चोपडे यांची द्राक्षनिर्यात कंपनी

Article by Mukund Pingle : नाशिक जिल्ह्यातील लोणवाडी येथील ‘चोपडे फार्म्स ॲण्ड एक्स्पोर्ट'' कंपनी जागतिक स्तरावर अत्यंत कष्टमय प्रवासातून नावारूपाला आली आहे.

मुकुंद पिंगळे

मुकुंद पिंगळे

Grape Farming : नाशिक जिल्ह्यातील लोणवाडी येथील ‘चोपडे फार्म्स ॲण्ड एक्स्पोर्ट’ कंपनीने आज जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. आज कंपनीची मुख्य मदार ३९ वर्षे वयाचे अमित चोपडे सांभाळत आहेत. पण कंपनीच्या यशाचा प्रवास तेवढा सोपा नव्हता. सन १९६० च्या दशकात त्यांचे आजोबा कै. महादू काशिराम चोपडे यांनी त्या काळात द्राक्षावर आधारित पीकपद्धती नवी असताना आव्हाने पेलून वाटचाल केली.

देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षांची विक्री व्हायची. पुढे अमित यांचे वडील सुधाकर व काका कै. विष्णू यांनी प्रयोगशीलतेचा वारसा पुढे चालवा. आज अमित, आपले सख्खे बंधू सुमीत व चुलतबंधू संदीप यांच्यासह द्राक्षनिर्यातीत जिद्द, चिकाटीने पाय रोवून उभे आहेत.

इष्टापत्तीतून व्यावसायिकतेकडे...

सन २०१० मध्ये वाढ नियंत्रकाचे अवशेष आढळल्याने भारतीय द्राक्षांच्या युरोपीय निर्यातीत मोठे संकट निर्माण झाले. काही व्यापाऱ्यांनी बागायतदारांना द्राक्षाचे पैसे देण्यास नकार दिला. त्या वेळी बागायतदार असलेल्या चोपडे यांना सुमारे २० लाखांचा फटका बसला. शिवाय स्थानिक व्यापाऱ्यांकडूनही वेळोवेळी आर्थिक फसवणुकीचा अनुभव आला.

त्यातूनच आपण स्वतः निर्यातदार का होऊ नये अशी कुटुंबात चर्चा सुरू झाली. पण त्या व्यवसायाची पार्श्वभूमी, भांडवल, अनुभव या पैकी काहीच नव्हते. पण हिमतीने सुधाकर यांनी निर्यातदार होण्याचा प्रस्ताव थोरला मुलगा अमित यांच्यासमोर मांडला.

त्यावेळी तो पुणे येथे एमबीएचे शिक्षण घेऊन एका कंपनीत नोकरी करीत होता. पण द्राशशेतीतील हे आव्हान म्हणजे प्रगतीची मोठी संधीही आहे असा विचार अमित यांनी केला. मोठ्या पगाराची नोकरी सोडून वयाच्या २४ व्या वर्षी त्यात पाऊल टाकले देखील.

अभ्यासपूर्वक वाटचाल

अभ्यासपूर्वक एकेक पाऊल पुढे टाकताना सन २०११ मध्ये ‘माधव ग्लोबल ट्रेड’ नावाने शेतमाल निर्यात कंपनी स्थापन केली. स्वतः प्रत्यक्ष जर्मनी, नेदरलँड, इंग्लंड येथे जाऊन आयातदारांशी संपर्क तयार केले. पहिली ‘ऑर्डर’ मिळविताना मोठा संघर्ष वाट्याला आला. पण मोठ्या प्रयत्नांतून दोन कंटेनर्स पाठविण्यात अमित यशस्वी झाले.

अत्यल्प भांडवलामुळे भाडेतत्त्वावर शीतगृह व पॅकहाउस घेऊन सात वर्षे कामकाज केले. सन २०१८ मध्ये बँकेच्या अर्थसाह्यातून साडेपाच कोटींचे शीतगृह व पॅकहाउस उभारले. त्यातून ‘चोपडे फार्म्स ॲण्ड एक्स्पोर्ट’ या नावाने व्यवसायाचा विस्तार केला. सोबत पूर्वीचा ‘माधव ग्लोबल ट्रेड’ या नावानेही व्यवसाय सुरू ठेवला.

कष्टाने दिली प्रतिष्ठा : ‘एमबीए’च्या शिक्षणाचा उपयोग करून अमित विविध देशांमध्ये फिरून तेथील बाजारपेठांना भेटी देतात. निर्यात क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेकडून ‘एक्स्पोर्ट लीडरशिप ॲवॉर्ड’ अंतर्गत ‘इमर्जिंग एक्स्पोर्टर ऑफ द इयर’ या पुरस्काराने (२०१९) त्यांना गौरविले आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडूनही ‘स्टार एक्स्पोर्ट हाउस’ हे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. संधी ओळखून केळी, आंबा व कांदा निर्यातीसाठीही प्रयत्न सुरू आहेत.

आजचा विस्तार दृष्टिक्षेपात

एकत्र कुटुंब पद्धतीने चोपडे यांची ३० एकरांत द्राक्ष उत्पादन व निर्यात. क्रिमसन, थॉमसन, सुधाकर सीडलेस, फ्लेम, शरद सीडलेस आदी वाण. व निर्यात

स्वतःसोबत १७५ बागायतदारांकडूनही माल घेऊन सुमारे १८ देशांत निर्यात.

यात युरोपीय देश (उदा. जर्मनी), इंग्लंड, नेदरलॅण्ड, रशिया, चीन, हाँगकाँग, थायलंड, मलेशिया,

व आखाती देश.

दोन प्रीकूलिंग (प्रति १० टन क्षमता) व दोन कोल्ड स्टोअरेज (प्रति १५० टन क्षमता) -

आंतरराष्ट्रीय मानकांचा वापर. निर्यातीसंबंधी ग्रास्प, बीआरसी, स्मेटा ही मानके प्राप्त

अपेडा मान्यताप्राप्त प्रमाणित सर्व कामकाज

आकर्षक पद्धतीने ब्रॅण्डिंग व पॅकेजिंग, ‘रिसायकल’ होणाऱ्या पनेटचा वापर होतो. साडेचार किलो, ५ व ८ किलोप्रमाणे कोरूगेडेट बॉक्सचा वापर.

अमित आंतरराष्ट्रीय बाजारात मार्केटिंग, व्यवसायवृद्धी, आर्थिक कामकाज, विपणन व विक्री सांभाळतात. सुमीत कृषी पदवीधर व कृषी व्यवसाय व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवीधारक. शेतकऱ्यांना मार्गदर्शन, पॅकहाऊस, हाताळणी, प्रतवारी, गुणवत्ता नियंत्रण, मजूर व्यवस्थापन ते सांभाळतात. संदीप यांच्याकडे द्राक्ष खरेदी, काढणीचे नियोजन.

मण्याचा १६ मिमीहून मोठा आकार. ब्रिक्स टक्केवारी- १७ टक्क्यांच्या आसपास.

हंगामी ३०० मजुरांना रोजगार, पूर्णवेळ १५ जणांचे मनुष्यबळ

अमित चोपडे ९८२३०८६९०७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT