Monsoon Agrowon
हवामान

Return Monsoon: उद्या पाच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Monsoon Back : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उद्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी होतील. तसेच पाच जिल्ह्यांमध्ये विजा आणि वेगाच्या वाऱ्यासह काही भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

Anil Jadhao 

Rain Update : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उद्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी होतील. तसेच पाच जिल्ह्यांमध्ये विजा आणि वेगाच्या वाऱ्यासह काही भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

कोकण आणि इतर काही भागात उद्या पावसाला पोषक हवामान आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये उद्या येलो अलर्ट दिला. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, नाशिक, धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये विजा, ढगांच्या गडगडाटासह आणि वेगवान वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यात आहे. यासोबतच कोल्हापूर, सातारा, रायगड, पालघर आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

माॅन्सूनचा परतीचा प्रवास आज थांबला होता. आज माॅन्सून कालच्याच भागात होता. माॅन्सूनने काल झारखंड आणि छत्तीसगडच्या संपूर्ण भागातून माघार घेतली होती. तर पश्चिम बंगालचा बहुतांशी भाग, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, तेलंगणाचा बहुतांशी भाग आणि कर्नाटकच्या काही  भागातून माॅन्सूनने माघार घेतली आहे. महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या काही भागात माॅन्सूनचे अस्तित्व आहे. माॅन्सूनची सीमा फोरबेसगंज, माल्दा, विशाखापट्टनम, नालगोंडा, रायचूर आणि वेंगुर्ला या भागात कायम होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biogas Energy: ‘एलपीजी’वाले गॅसवर; बायोगॅस उभारणाऱ्यांना ‘नो टेन्शन’

Livestock Farming: पशुपालन उद्योजकतेस मिळणार चालना

Middle East Conflict: इराणच्या सर्वोच्च नेत्यांना लक्ष्य करण्याच्या रणनीतीचे विपरीत परिणाम

Agriculture Subsidy: कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी मिळणार ६० टक्के अनुदान

Sugar Production: देशातील साखर उत्पादनात ८६ टक्के वाटा तीन राज्यांचा

SCROLL FOR NEXT