Koyna Dam Rain : कोयना धरण नव्वदी पार तर कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांची अशी आहे स्थिती, उद्यापर्यंत पाऊस राहणार

Kolhapur Satara Rain : कोल्हापूर, साताऱ्यासह कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळला. तर कोकण आणि साताऱ्याच्या पश्चिम भागात दिवसभर जोरदार पाऊस झाला.
Koyna Dam Rain
Koyna Dam Rainagrowon

Maharashtra Rain News : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. कोल्हापूर, साताऱ्यासह कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळला. तर कोकण आणि साताऱ्याच्या पश्चिम भागात दिवसभर जोरदार पाऊस झाला. दरम्यान आज आणि उद्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

सिंधुदुर्गात दोडामार्ग तालुक्यासह जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. समुद्रकिनारपट्टीवर जोरदार वारे वाहत असून अरबी समुद्र खवळलेला आहे. देवगड समुद्रात गेले तीन दिवस राज्यातील व परराज्यातील बोटी बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस झाला तर धरण क्षेत्रात भागात अतिवृष्टी झाली.

कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाल्याने प्रमुख १५ धरणांपैकी १२ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, जिल्ह्याला सोमवारी ‘यलो अलर्ट' देण्यात आला आहे. अतिवृष्टी कोठे? पाटगाव धरण क्षेत्रात १०५ मि.मी., घटप्रभा धरण क्षेत्रात १२५ मि.मी. तर जांबरे धरण क्षेत्रात १४५ मि.मी. पावसाची नोंद झाली.

राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर कमी होत असून फक्त कोकण व मध्य महाराष्ट्रात त्याचा जोर राहील. ७ ऑक्टोबरपर्यंत असे वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आठ दिवस राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र २ ते ७ ऑक्टोबर या पाच दिवसांत राज्यातून पाऊस कमी होत आहे. कोकणात ७ ऑक्टोबरपर्यंत, मध्यम मराठवाड्यात ४, तर विदर्भात ३ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज आहे.

Koyna Dam Rain
Rain Forecast Maharashtra : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुढचे तीन दिवस पावसाचा मुक्काम

कोयना धरण

मागच्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने ९० टक्के पार केले पंरतु कोयना धरण भरण्यासाठी अद्यापही १२ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, आता परतीचा पाऊस कितपत साथ देतो यावर कोयना धरण चालू मोसमात शंभर टक्के पूर्ण भरणार का? याकडे सगळ्याचे लक्ष लागून आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्वर, या जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com