Rainy Weather Agrowon
हवामान

Paus Andaj : आणखी दोन दिवस पावसाचे; राज्यात ठिकठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज

Weather Update : राज्यातील काही भागांमध्ये पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागांमध्ये पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर काही ठिकाणी येलो अलर्टही देण्यात आला. राज्याच्या वेगवेगळ्या भागात पुढच्या तीन दिवसांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. 

हवामान विभागाने आज विजा, ढगांच्या गडगडाटासह काही जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला. आज धुळे, जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात विजा, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

तसेच काही ठिकाणी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकते, असाही अंदाज आहे. तर ठाणे, रायगड, नंदूरबार, पुणे, सातारा, सांगली, जालना जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला. सांगली, सालापूर, बीड, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज दिला. 

उद्या धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात काही भागात विजा, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच काही ठिकाणी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

शनिवारी विदर्भातील  बुलडाणा, अकोला, अमरवती, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी तसेच खानदेशातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच काही ठिकाणी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकते, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lucerne Fodder: एकदा लागवड, तीन वर्षे चारा! पशुपालकांसाठी लसूणघास फायदेशीर

Fruit Insurance Refund: फळ पीकविमा परतावा अप्राप्त

Rabies Prevention Tips: रेबीज रोखण्यासाठी लसीकरणासह जनजागृती आवश्यक

Water Storage: प्रकल्प सलग सातव्या वर्षी १०० टक्के भरले

Fruit Crop Insurance: फळपीक विम्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT