Paus Andaj : गारपीटीने झोडपले; आजही पावसाचा अंदाज; बुलडाणा, जालना जिल्ह्यात काही ठिकाणी पीके जमिनदोस्त

Weather Update : हवामान विभागाने आजही विदर्भ आणि मराठवड्यातील काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
Weather
WeatherAgrowon
Published on
Updated on

Pune News : विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील काही भागात वादळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे रब्बीतील पीके आणि फळपिकांना मोठा तडाखा बसला. हवामान विभागाने आजही विदर्भ आणि मराठवड्यातील काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.

हवामान विभागाने आज विदर्भातील चार जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला. अकोला, अमरावती, बुलडाणा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर भंडारा, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही देण्यात आला. मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यातही हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिल

Weather
Weather Forecast : विदर्भात वादळी पावसाचा इशारा

काल राज्यातील अनेक भागात वादळी पाऊस आणि गारपीटने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संत्रा, द्राक्ष, मोसंबी, डाळींब या फळपिकांसह हरभरा, गहू, मका, कांदा आणि भाजीपाला पिकांना तडाखा बसला.

बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली.  संग्रामपूर, नांदुरा, जळगाव जामोद, मलकापूर, चिखली आणि देऊळगावराजा तालुक्यातील काही भागात गारपीटीसह मुसळधार पाऊस झाला. गारांचा खच रस्ते आणि शेतात दिसून येत होता. तालुक्यात गारपीट झाली. तसेच इतर तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. अकोला जिल्हासह शहरात विजांच्या कडकडासह जोरदार पावसाने हजेरी लावली.

जालना जिल्ह्यातही अनेक ठिकाणी गारपीट झाली. जालना, बदनापूर, भोकरदन, अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर आदी तालुक्यातील काही गावांमध्ये पाऊस झाला. जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव, टेंभूर्णी, भारज, काळेगाव, नांदखेडासह अनेक गावांना गारपिटीचा तडाखा बसला. तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Weather
El Nino 2024 : 'एल निनो'चा प्रभाव कमी; ला निना स्थितीबद्दल जागतिक हवामान संस्थांचा अंदाज काय?

जळगाव, अमळनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसासह गारपीट झाली.अमळनेर तालुक्यात सडावण, दहीवद, नगाव, गळखांब, पातोंदा, सावखेडा या गावांमध्ये मुसळधार पावसासह काही ठिकाणी गारपीट झाली. चाळीसगाव तालुक्यातील पाटणा, गणेशपूर, बेलदारवाडी, बाणगाव, शिंदी आणि ओढरे गावात गारपीट झाल्याची माहिती आहे. पारोळा तालुक्यातील भिलाली गाव आणि परासरातील इतर गावांना गारपीटीने झोडपले.

सोलापूरच्या बार्शीत तालुक्यातील श्रीपत पिंपरीत अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस झाला. तर मराठवड्यातील नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com