Weather Agrowon
हवामान

Weather Forecast : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Weather Update : विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे.

Team Agrowon

Pune News : विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. आज (ता. २९) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. कोकणातही विजांसह पावसाची शक्यता आहे.

राज्याच्या हवामानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. किमान तापमानाचा पारा वाढल्याने गारठा नाहीसा झाला असून, दुपारी उन्हाचा चटका, उकाड्यामुळे घामटा निघत आहे. बुधवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या जवळपास आहे.

दक्षिण कर्नाटकपासून कोकण, मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे मध्य भारतासह राज्यात ढगाळ हवामान होत आहे. विदर्भ, मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपीट झाली. आज मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा आहे. कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बुधवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.८ (१८.१), धुळे ३३.० (१५.५), जळगाव ३३.९ (१८.७), कोल्हापूर ३४.५ (२२.९), महाबळेश्वर २८.८ (१७.६), मालेगाव ३५.० (१९.४), नाशिक ३४.२ (१७.४), निफाड ३२.० (१३.५), सांगली ३५.२ (२२.१), सातारा ३४.८ (२१.५), सोलापूर ३६.२ (२२.८), सांताक्रूझ ३३.६ (२०.६), डहाणू ३२.० (१९.८), रत्नागिरी - (२२.३), छत्रपती संभाजीनगर ३३.६ (१९.७),

नांदेड ३४.२ (२२.४), परभणी ३४.७ (२१.०), अकोला ३२.२ (२०.६), अमरावती ३३.२ (१९.३), बुलडाणा ३१.४ (१८.०), चंद्रपूर ३५.८ (१८.२), गडचिरोली ३३.४ (१९.४), गोंदिया ३२.८ (१८.४), नागपूर ३४.० (१९.८), वर्धा ३५.०(१९.६), वाशीम ३६.० (१८.५), यवतमाळ ३५.० (२०.५).

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT