Weather Forecast : विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

Rain Update : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसासह गारपिटीने तडाखा दिला आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

Pune News : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसासह गारपिटीने तडाखा दिला आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. तर ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढला आहे. आज (ता. २८) विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत असल्याचे दिसून येत आहे. निफाड, धुळ्यामध्ये असलेला गारठा कमी झाला असून, किमान तापमान पुन्हा १० अंशाच्या वर गेले आहे. तर दुपारच्या वेळी उन्हाची ताप वाढल्याने मंगळवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सांताक्रूझ येथे देशातील उच्चांकी ३७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुणे, सोलापूर, अकोला येथे तापमान ३५ अंशाच्या पार आहे. राज्यात ढगाळ हवामान होत असून, उकाड्यात वाढ झाली आहे.

Weather Update
Weather Forecast : विदर्भात वादळी पावसाचा इशारा

पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून पूर्व राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण कर्नाटकपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे मध्य भारतासह महाराष्ट्रात ढगाळ हवामान होत आहे. आज (ता. २८) राज्यात ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. विदर्भात तुरकळ ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Weather Update
Weekly Weather : विदर्भ, मराठवाड्यात अल्प पावसाची शक्यता

मंगळवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.१ (१८.२), धुळे ३४.५ (१२.६), जळगाव ३५.२ (१६.१), कोल्हापूर ३४.६ (२१.०), महाबळेश्वर २७.८ (१८.६), मालेगाव ३३.० (२१.८), नाशिक ३४.३ (१८.६), निफाड ३२.८ (१३.२), सांगली ३४.७ (२०.८), सातारा ३४.६ (१९.७), सोलापूर ३५.८ (२३.६), सांताक्रूझ ३७.५ (२३.०), डहाणू ३१.० (१९.८), रत्नागिरी ३२.४ (२१.२),

छत्रपती संभाजीनगर ३३.४ (२१.०), नांदेड ३३.४ (२२.८), परभणी ३४.० (२१.५), अकोला ३५.० (२०.६), अमरावती ३२.० (२०.८), बुलढाणा ३३.८ (१८.६), चंद्रपूर ३३.८ (१७.६), गडचिरोली ३२.० (१९.०), गोंदिया ३०.८ (२१.३), नागपूर ३१.३(२२.२), वर्धा ३१.८(२२.६), वाशीम ३४.४ (१९.६), यवतमाळ ३२.५ (२५.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com