Rain  Agrowon
हवामान

Retreating Monsoon : राज्यात पावसाची उघडीप राहणार; राज्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Alert : राज्यातील बहुतांशी भागांमध्ये मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप कायम दिसत आहे. पुढील ५ दिवस राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील बहुतांशी भागांमध्ये मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप कायम दिसत आहे. पुढील ५ दिवस राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. मात्र काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. 

माॅन्सूनने २३ सप्टेंबरला परतीचा प्रवास सुरु केल्यानंतर राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून माघार घेतली होती. परंतु त्यानंतर २४ सप्टेंबरपासून मात्र सलग ७ व्या दिवशीही माॅन्सूनने आपला मुक्काम कायम ठेवला. आजही माॅन्सूनचा प्रवास थबकला होता. 

हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तसेच रायगड, नगर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर राज्याच्या इतर भागात पावसाची उघडीप राहील.

उद्या राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. तर सातारा आणि सांगली जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज दिला. तसेच गुरुवारी, शुक्रवारी आणि शनिवारीही राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, धाराशिव, लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT