Maharashtra Rain Alert : राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज; राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

Rain Update : हवामान विभागाने राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला.
Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. हवामान विभागाने राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. 

माॅन्सूनने परतीचा प्रवास सुरु केल्यानंतर राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून माघार घेतली होती. परंतु त्यानंतर मात्र सलग ६ व्या दिवशीही माॅन्सूनने आपला मुक्काम कायम ठेवला. आजही माॅन्सूनचा प्रवास थबकला होता. 

Rain
Weekly Weather : पावसाचे प्रमाण कमी-अधिक राहण्याची शक्यता

हवामान विभागाने आज सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर बीड, सातारा, नाशिक, नंदूरबार, धुळे, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

Rain
Maharashtra Rain Alert : दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

उद्या सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर धाराशिव, लातूर, बीड, सातारा, पुणे, नगर, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

तसेच पुढील तीन दिवस म्हणजेच बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर राज्याच्या इतर भागात पावसाची उघडीप राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com