Monsoon Agrowon
हवामान

Return Monsoon : परतीचा माॅन्सून महाराष्ट्रात दाखल; राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Monsoon Forecast : राज्यात पुढील ५ दिवस काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सूनचा परतीचा प्रवास अखेर महाराष्ट्रापर्यंत आला. नंदूरबार जिल्ह्यात परतीचा माॅन्सून पोचला. राज्याच्या बहुतांशी भागात मागील आठवडाभरापासून पावसाची उघडीप आहे. तर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. राज्यात पुढील ५ दिवस काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनने आजही काही राज्यांमधून माघार घेतली. आज माॅन्सूनने उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या आणखी काही भागातून माघार घेतली. तर महाराष्ट्राच्या काही भागातूनही माॅन्सून परतला. आज माॅन्सूनचा परतीचा प्रवास नंदूरबार जिल्ह्यापर्यंत झाला. माॅन्सूनची सिमा आज नौटनवा, सुलतानपूर, पन्ना, नरमदापुरम, खरगोन, नंदूरबार आणि नवसारी भागात होती. माॅन्सून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये गुजरात, मध्य प्रदेशच्या उर्वरित भागातून माघारी फिरेल. तर महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून माघार घेईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक, नगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

उद्या कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे, नगर, नाशिक, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर सातारा, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर तसेच जळगाव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज काही ठिकाणी आहे. 

सोमवारी आणि मंगळवारीही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच राज्यात किमान तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT