Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा कायम

Rain Forecast : राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Rain
RainAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढल्याने तापमानाचा पारा ३६ अंशाच्या पुढे आहे. तुरळक ठिकाणी हलका पाऊस हजेरी लावत आहे. आज (ता. ५) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी बुधवारी (ता. २) वायव्य भारताच्या बहुतांश भागातून माघार घेतली. दोन दिवसांपासून मॉन्सूनच्या परतीची सीमा कायम आहे. मॉन्सूनच्या परतीच्या प्रवास सुरू होण्यास पोषक हवामान असल्याने दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. पहाटेच्या वेळी धुके आणि दव पडत असल्याचे चित्र आहे.

Rain
Pune Rain : पुण्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला, नागपूर, गडचिरोली, वर्धा येथे तापमानाचा पारा पस्तिशीपार आहे. आज (ता. ५) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहून, मुख्यतः उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.

Rain
Maharashtra Rain Alert : राज्यात १४ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता; राज्यात बहुतांशी ठिकाणी पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज

शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३१.९, जळगाव ३४.२, कोल्हापूर ३३.५, महाबळेश्वर २६.६, मालेगाव ३३.२, नाशिक ३०.०, निफाड ३२.०, सांगली ३२.६, सातारा ३२.६, सोलापूर ३३.२, सांताक्रूझ ३२.९, डहाणू ३३.०, रत्नागिरी ३२.०, छत्रपती संभाजीनगर ३३.०, बीड ३२.६, परभणी ३४.४, अकोला ३५.८, अमरावती ३४.४, भंडारा २८.०, बुलडाणा ३०.६, ब्रह्मपुरी ३६.०, चंद्रपूर ३६.०, गडचिरोली ३५.०, गोंदिया ३४.५, नागपूर ३५.६, वर्धा ३५.०, वाशीम ३४.०, यवतमाळ ३४.०.

३५ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे

ब्रह्मपुरी ३६, चंद्रपूर ३६, अकोला ३५.८, नागपूर ३५.६, गडचिरोली ३५, वर्धा ३५.

कमी दाब क्षेत्राची निर्मिती

आग्नेय बांगलादेश आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे बांगलादेश आणि पश्चिम बंगाललगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. लक्षद्वीप आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

विजांसह पावसाचा अंदाज

धुळे, जळगाव, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com