Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Retreat : मॉन्सून दमदार बरसला हंगामात राज्यात २६ टक्के अधिक पाऊस

अमोल कुटे

Pune News : यंदाच्या मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) पाऊस दमदार बरसला. मात्र संपूर्ण हंगामात पावसाचे वितरण असमान होते. मॉन्सूनचे वेळेआधी आगमन झाल्यानंतर जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने सरासरी गाठली, तर जुलै महिन्यात धुवाधार बरसल्यानंतर सप्टेंबर महिन्यातील अखेरच्या टप्प्यात दमदार पाऊस कोसळला. सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात १२५२.१ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा २६ टक्के अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

१ जून ते ३० सप्टेंबर हा मॉन्सूनच्या पावसाचा हंगाम मानला जातो. या कालावधीत राज्यात दीर्घकालीन सरासरीनुसार ९९४.५ पाऊस पडतो. यंदा राज्यात तब्बल १२५२.१ मिलिमीटर (२६ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली. गत वर्षी राज्यात ९६५.७ मिलिमीटर (९७ टक्के) म्हणजेच ३ टक्के कमी पाऊस झाला होता. गत वर्षी पावसाने चिंता वाढवली होती. मात्र यंदा चारही महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबरअखेर देशात ९३४.८ मिलिमीटर (८ टक्के अधिक) पाऊस झाला.

यंदाच्या हंगामात १९ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर दाखल झालेला मॉन्सून ३० मे रोजी केरळमध्ये पोहोचला. अरबी समुद्रातून प्रगती करत ६ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला. त्यानंतर २३ जून रोजी मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला. तर, २ जुलै रोजी मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला. मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर राज्यात पावसाचे वितरण असमान असल्याचे दिसून आले. सह्याद्रीच्या कुशीतील धरणे यंदा ओसंडून वाहिली. राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून ८७ टक्के पाणीसाठा झाला आहे. कोयना, उजनी आणि जायकवाडी धरणांत १०० टक्के पाणीसाठा असून, सर्वच मोठ्या धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणी जमा झाले आहे.

सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यातील चारही विभागांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक ३९ टक्के पाऊस झाला आहे. तर कोकण-गोवा विभागात २९ टक्के अधिक, मराठवाड्यात २० टक्के अधिक, तर विदर्भात १७ टक्के अधिक पाऊस झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पावसाची आकडेवारी भरून आली असली तरी पावसाचे असमान वितरण मात्र यंदाही पाहायला मिळाले. सप्टेंबर महिन्यात अनेक ठिकाणी जवळपास १२ ते १५ दिवसांची पावसाने दडी दिसून आल्यानंतर अखेरच्या टप्प्यात पावसाने दणका दिला.

मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) राज्यात विभागनिहाय पडलेला पाऊस

विभाग---सरासरी---पडलेला---टक्केवारी

कोकण-गोवा---२८७०.८---३७१०.६---अधिक २९

मध्य महाराष्ट्र---७४७.४---१०३५.८---अधिक ३९

मराठवाडा---६४२.८---७७२.५---अधिक २०

विदर्भ---१०९८.५---९३७.३---अधिक १७

हिंगोलीमध्ये पावसात अखेरपर्यंत तूट

राज्यातील जिल्हानिहाय पडलेल्या पावसाची स्थिती विचारात घेता यंदा मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण चांगले असल्याचे दिसून आले. नगर जिल्ह्यात सर्वाधिक (४९ टक्के अधिक) पाऊस झाला. सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा ४० टक्के अधिक पावसाची नोंद झाली. तर मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसात तूट असल्याचे दिसून आले, ३० सप्टेंबर अखेर हिंगोली जिल्ह्यात ४८९.९ मिलिमीटर म्हणजेच उणे ३५ टक्के पाऊस झाला. तर अमरावती जिल्ह्यातही पावसात उणे २ टक्क्यांची तूट दिसून आली.

राज्यात जिल्हानिहाय पडलेल्या पावसाचे प्रमाण :

सरासरीपेक्षा अधिक (२० ते ५९ टक्के अधिक) :

पालघर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली.

सरासरी इतका (उणे १९ ते १९ टक्के अधिक) :

मुंबई शहर, ठाणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया.

सरासरीपेक्षा कमी पाऊस (उणे २० ते उणे ५९ टक्के)

हिंगोली.

मॉन्सून हंगामात महिनानिहाय पडलेला पाऊस (सौजन्य : हवामान विभाग)

महिना---सरासरी---पडलेला---तफावत (टक्क्यांत)

जून---२०९.८---२११.३ ---अधिक १

जुलै---३२४.२---५२९.५---अधिक ६३

ऑगस्ट---२८०.८---२८६.५ ---अधिक २

सप्टेंबर---१८०.३---२२५.५---अधिक २५

मॉन्सून हंगामातील (जून ते सप्टेंबर) जिल्हानिहाय पावसाची स्थिती :

जिल्हा---सरासरी---पडलेला---तफावत (टक्क्यांत)

मुंबई शहर---२०९४.५---२४७१.८---अधिक १८

मुंबई उपनगर---२३१८.८---३०८२.९---अधिक ३३

पालघर---२२६२.७---२९९७.७---अधिक ३२

रायगड---३१२७.४---३७८३.२---अधिक २१

रत्नागिरी---३१९४.४---४०२५.७---अधिक २६

सिंधुदुर्ग---२९५०.७---४१४१.४---अधिक ४०

ठाणे---२४३३.३---२७२३.७---अधिक १२

नगर---४५६.०---६७८.०---अधिक ४९

धुळे---५४३.९---७४२.६---अधिक ३७

जळगाव---६२५.२---९११.३---अधिक ४६

कोल्हापूर---१७११.४---२४८७.४---अधिक ४५

नंदूरबार---८४१.६---११४८.८--- अधिक ३६

नाशिक---८९३.९---१२८७.६--- अधिक ४४

पुणे---९४९.२---१३५९.५---अधिक ४३

सांगली---४८६.१---७२१.६---अधिक ४८

सातारा---८४४.६---९७५.५---अधिक १५

सोलापूर---४५८.१---५११.६---अधिक १२

बीड---५५७.४---७१९.४---अधिक २९

छ. संभाजीनगर---५६३.६---६६८.८--- अधिक १९

धाराशिव---५७९.६---७१४.९---अधिक २३

हिंगोली---७५८.३---४८९.९---उणे ३५

जालना---५९१.८---७७४.८---अधिक ३१

लातूर---६६६.८---९१५.१---अधिक ३७

नांदेड---७८२.६---८९९.९---अधिक १५

परभणी---७०४.९--९३०.९---अधिक ३२

अकोला---६९४.२---७८५.७----अधिक १३

अमरावती---८२२.९---८०३.२---उणे २

भंडारा---१०८५.१---१२२३.१---अधिक १३

बुलडाणा---६४७.६---८०२.२---अधिक २४

चंद्रपूर---१०७६.३---१२२७.१---अधिक १४

गडचिरोली---१२८९.७---१३१७.६---अधिक २५

गोंदिया---१२१४.७---१३१०.१---अधिक ८

नागपूर---९३८.५---१०४५.३---अधिक ११

वर्धा---८४०.८---१०८४.९---अधिक २९

वाशीम---७७२.३---८९७.५---अधिक १६

यवतमाळ---८०८.८---१०४२.८---अधिक २९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Central government flood help : केंद्राकडून महाराष्ट्राला १४९२ कोटी रुपयांची मदत जाहीर

Indian Education : नागरिक घडविणारे ‘बुनियादी’ शिक्षण

Maharashtra Cabinet Decision : निर्णयांचा पाऊस, अंमलबजावणीचे काय?

Kondhane Dam Project Scam : कोंढाणे धरण प्रकल्पात १४०० कोटींचा घोटाळा

Namo Shetkari Mahasanman Scheme : ‘नमो महासन्मान’च्या पाचव्या हप्त्यासाठी २२५४ कोटी

SCROLL FOR NEXT