Rain Update : बावड्यात १२३ मिलिमीटर पावसाची नोंद

Rain Alert : पुणे जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दमदार पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पडत आहे.
Rain
RainAgrowon
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दमदार पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पडत आहे. गुरुवारी (ता. २६) सकाळी आठपर्यंत इंदापुरातील बावडा येथे सर्वाधिक १२३ मिलिमीटर पाऊस पडला असून जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे जवळपास १६ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागांत कमीअधिक पाऊस पडत आहे. या पावसामुळे पिकांचे नुकसान होत असले तरी रब्बी पेरण्यासाठी व भात पिकांसाठी हा पाऊस पोषक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हवेलीतील पुणे वेधशाळा, केशवनगर, खडकवासला येथे ११३ मिमी पाऊस झाला.

Rain
Nashik Rain Update: उद्या नाशिक जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा अंदाज

तर वाघोली ५८ मिमी, उरुळीकांचन, खेडमध्ये ३६ मिमी, तर थेऊर, कोथरूड, भोसरी, चिंचवड, कळस, हडपसर येथे हलका पाऊस पडला. मुळशीतील मुठे येथे ४१ मिमी, तर मालेत ३६ मिमी, तर पौड, घोटावडे, थेरगाव, पिरंगुट येथे तुरळक सरी बरसल्या. भोरमधील वेळू ४६ मिमी, भोलावडे ३२ मिमी, तर नसरापूर, किकवी, आंबवडे, संगमनेर, निगुडघर, मावळमधील वडगाव मावळ, तळेगाव, काले, कार्ला, खडकाळा, लोणावळा, शिवणे येथे हलका पाऊस पडला.

Rain
Nashik Rain Update: उद्या नाशिक जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा अंदाज

वेल्हा येथे ९५ मिमी, विंझर ४१ मिमी, तर आंबवणे, पानशेत येथे हलका पडला. जुन्नरमधील नारायणगाव येथे ५३ मिमी, तर जुन्नर, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, राजूर, डिंगोरे, आपटाळे, ओतूर येथे तुरळक सरी कोसळल्या. खेडमधील पिंपळगाव येथे ३२ मिमी, तर वाडा, राजगुरुनगर, कुडे, पाईट, चाकण, आळंदी, कन्हेरसर, कडुस येथे हलका, तर आंबेगावमधील आंबेगाव येथे ४५ मिमी, तर घोडेगाव, कळंब, पारगाव, मंचर येथे चांगलाच शिडकावा झाला.

शिरूरमधील न्हावरा येथे ८० मिमी, कोरेगाव येथे ५८ मिमी, तर टाकळी, वडगाव, मलठण, तळेगाव, रांजणगाव, पाबळ, शिरूर येथे हलका, बारामतीतील माळेगाव, पणदरे, वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव, उंडवडी येथे हलका पाऊस पडला. इंदापुरातील भिगवण, काटी येथे ६१ मिमी, तर इंदापूर ५०, लोणी ४२ मिमी, तर निमगाव, अंथुर्णी, सणसर येथे तुरळक, दौंडमधील पारगाव येथे ८० मिमी, तर बोरीभडक ५४, वरवंड ३९, पाटस ३३, यवत ३६ मिमी, तर कडेगाव, राहू, देऊळगाव, रावणगाव, दौंड, खामगाव, वडगाव बांदे, बोरी पार्धी येथे हलका, पुरंदरमधील भिवंडी येथे ३१ मिमी तर सासवड, कुंभारवळण, जेजुरी, परिंचे, राजेवाडी, वाल्हा येथे तुरळक सरी बरसल्या.पावसामुळे पिकांना दिलासा मिळत असला तरी काही ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान वाढत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com