Monsoon  Agrowon
हवामान

Monsoon Retreat : माॅन्सून निघाला परतीच्या प्रवासाला; पश्चिम राजस्थान, कच्छच्या काही भागातून माघार

Monsoon Reversal : मॉन्सूनचा परतीचा प्रवास उशीराने सुरू झाला असून, दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या सहा दिवस उशीराने मॉन्सूनने वायव्य भारतातून मुक्काम आहे.

Anil Jadhao 

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली आहे. सोमवारी (ता. २३) मॉन्सूनने पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागातून माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. मॉन्सूनचा परतीचा प्रवास उशीराने सुरू झाला असून, दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या सहा दिवस उशीराने मॉन्सूनने वायव्य भारतातून मुक्काम आहे. गतवर्षी २५ सप्टेंबर रोजी मॉन्सून वारे राजस्थानातून माघारी फिरले होते.  

वायव्य भारतात समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने केंद्रभागातून बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी स्थिती (ॲण्टी सायक्लोन) तयार झाले आहे. नैर्ऋत्य राजस्थानमध्ये गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. या पूरक नोंदीनुसार नैर्ऋत्य राजस्थानमधून मॉन्सूनने माघार घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अनुपगड, बिकानेर, जोधपूर, भूज आणि द्वारका पर्यंतच्या भागातून मॉन्सून परतल्याने हवामान विभागाने म्हटले आहे.

मॉन्सून आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांचे सुधारित वेळपत्रकानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. गेली काही वर्षे मॉन्सूनच्या परतीचा मुहुर्त लांबत आहे. यंदाही तब्बल सहा दिवसाने (ता. २३) मॉन्सूनने राजस्थानातून माघारीस सुरूवात केली आहे. २ जूलै रोजी संपूर्ण देशात पोचलेल्या मॉन्सूनने २ महिने आणि २१ दिवस राजस्थानमध्ये मुक्काम केला.

यंदाच्या हंगामात १९ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर दाखल झालेला मॉन्सून ३० मे रोजी केरळमध्ये पोचला. अरबी समद्रातून प्रगती करत ६ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला. त्यानंतर २३ जून रोजी मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला. मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याने उद्या (ता. २४) पश्चिम राजस्थान आणि लगतच्या पंजाब, हरियाणा, गुजरात राज्याच्या काही भागातून मॉन्सून माघारी फिरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वायव्य भारतातून मॉन्सूनच्या परतीची वाटचाल 

वर्ष---तारीख
२०१९---९ ऑक्टोबर
२०२०---२८ सप्टेंबर
२०२१---६ ऑक्टोबर
२०२२---२० सप्टेंबर
२०२३---२५ सप्टेंबर
२०२४---२३ सप्टेंबर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

Tur Pest : तुरीवर अळीचे आक्रमण; वातावरण बदलाचा फटका

Elephant Rampage : जंगली हत्तींचा शेतशिवारात धुमाकूळ

Sugarcane Harvester : चांगतपुरी गावची पंजाब आणि हरियानाशी स्पर्धा

SCROLL FOR NEXT