Weather Forecast Agrowon
हवामान

Weather Update : कमाल तापमानाने गाठली चाळिशी

Maharashtra Minimum Temperature : राज्यात उन्हाळा सुरू झाल्याने यंदाच्या हंगामात कमाल तापमानाने चाळिशी गाठली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान ३९ अंशांच्या पार गेले आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात उन्हाळा सुरू झाल्याने यंदाच्या हंगामात कमाल तापमानाने चाळिशी गाठली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान ३९ अंशांच्या पार गेले आहे. मालेगाव येथे उच्चांकी ४० अंश तापमानाची नोंद झाली. उन्हाच्या झळा तापदायक ठरत असून, घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. आज (ता. १४) राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अंतर्गत ओडिशापासून छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक ते पूर्व-मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व विदर्भात ढगाळ हवामान कायम होत आहे. तर विदर्भात (Vidarbha) पावसाला पोषक हवामान होत आहे. यातच उन्हाचा चटका वाढल्याने झळा आणि उकाड्यामुळे घामटा निघत आहे. उन्हाची ताप आणखी वाढत जाणार आहे.

बुधवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत मालेगाव येथे राज्याचे हंगामातील उच्चांकी ४० अंश सेल्सिअस, सोलापूर येथे ३९.८ तापमान तर चंद्रपूर, वाशीम, यवतमाळ येथेही पारा ३९ अंशांपार पोहोचला आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे आहे. आज (ता. १४) उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :पुणे ३७.३ (१५.४), धुळे ३६ (१४.२), जळगाव ३७ (१५.५), कोल्हापूर ३७.७ (२२.९), महाबळेश्‍वर ३२.१ (१७.७), मालेगाव ४० (१८.२), नाशिक ३५.३ (१८), निफाड ३४.४ (१५.२), सांगली ३८.६ (२१.९), सातारा ३७.७ (१८.५), सोलापूर ३९.८ (२४.२), सांताक्रूझ ३५.१ (२४), डहाणू ३२.८ (२०.५), रत्नागिरी ३३.६ (२२),

छत्रपती संभाजीनगर ३५.६ (२१.६), नांदेड ३७.६ (२२.६), परभणी ३८.४ (२२.४), अकोला ३८.६ (२१.२), अमरावती ३७.२ (२०.३), बुलडाणा ३५.४ (२२.८), ब्रह्मपुरी ३८.८ (२१.८) चंद्रपूर ३९.४ (२१.६), गडचिरोली ३५.८ (२०.८), गोंदिया ३७.४ (१९.६), नागपूर ३८.५ (२०.१), वर्धा ३८.६ (२१.९), वाशीम ३९.२ (१९.६), यवतमाळ ३९ (२०.५).

३९ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे : मालेगाव ४०, सोलापूर ३९.८, चंद्रपूर ३९.४, वाशीम ३९.२, यवतमाळ ३९.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT