Summer Heat Update : उन्हाच्या झळांनी होरपळ वाढली

Weather Update : कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात उन्हाचा ताप वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३८ अंशांच्या पार गेल्याने उन्हाच्या झळांनी होरपळ वाढली आहे.
Summer Heat
Summer HeatAgrowon

Pune News : कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात उन्हाचा ताप वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३८ अंशांच्या पार गेल्याने उन्हाच्या झळांनी होरपळ वाढली आहे. आज (ता. १३) राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर छत्तीसगडपासून विदर्भ, तेलंगणा ते उत्तर अंतर्गत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व विदर्भासह महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील तालुक्यांत ढगाळ हवामान होत आहे. उन्हाचा चटका वाढल्याने झळा आणि उकाडा तापदायक ठरत घामटा निघत आहे. पुढील काळात उन्हाचा तडाखा आणखी वाढणार आहे.

Summer Heat
Weather Update : राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या

मंगळवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ३९.४ अंश सेल्सिअस, सोलापूर येथे ३९.२, यवतमाळ येथे ३९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी कमाल तापमान ३८ अंशांच्या पुढे गेले आहे. आज (ता. १३) उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Summer Heat
Summer Heat Update : उन्हाचा चटका अन् घामाच्या धारा

मंगळवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३६.९ (१६.५), धुळे ३६ (१४.२), जळगाव ३६.८ (१८.४), कोल्हापूर ३७.५ (२२.९), महाबळेश्‍वर ३२.१ (१८.९), मालेगाव ३८.४ (१९.४), नाशिक ३५.८ (१८.४), निफाड ३५ (१३), सांगली ३८.६ (२१.३), सातारा ३६.९ (२०), सोलापूर ३९.२ (२३.८), सांताक्रूझ ३४.१ (२०.९), डहाणू ३१.६ (२०.७), रत्नागिरी ३३.७ (१९.८),

छत्रपती संभाजीनगर ३६.५ (२०.४), नांदेड ३७.२ (२२.४), परभणी ३८.४ (२१.४), अकोला ३८.४ (२०.२), अमरावती ३७ (२०.७), बुलडाणा ३५.५ (२१.८), ब्रह्मपुरी ३७.४ (२२.०) चंद्रपूर ३८ (२०.४), गडचिरोली ३५.६ (२०.४), गोंदिया ३६ (१९.४), नागपूर ३७.४ (१९.८), वर्धा ३८.६ (२१), वाशीम ३९.४ (१८.८), यवतमाळ ३९ (२०.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com