Rain Alert Agrowon
हवामान

Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम

Sindhudurg Rain Alert : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, बुधवारी (ता. २५) सकाळपासून देखील पावसाची रिपरिप सुरू आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, बुधवारी (ता. २५) सकाळपासून देखील पावसाची रिपरिप सुरू आहे. दरम्यान, गेले दोन दिवस झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे काही एकरांवरील भातपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दगडमातीचा भराव अनेक ठिकाणी भातपिकांत साचला आहे. वीस तासांनंतर भुईबावडा घाटात वाहतूक पूर्ववत करण्यात बांधकाम विभागाला यश आले आहे.

जिल्ह्याच्या काही भागांत सोमवारी सायकांळी ढगफुटीसदृश पाऊस झाला. भुईबावडा, करूळ, नावळे, भिरवंडे यासह अन्य काही गावांमध्ये अशा स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे या गावांमध्ये काल सकाळपर्यंत पूरस्थिती होती. भुईबावडा आणि करूळ घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प होती.

दरम्यान वीस तासानंतर भुईबावडा घाटातून अवजड वाहतूक वगळून वाहने सोडण्यात आली. ढगफुटीसदृश पाऊस झालेल्या गावांमध्ये भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या भातपिकांचे दगडमातीचा भराव येऊन साचला आहे. तर काही ठिकाणी भातपिके जमिनीला चिकटली आहेत. या सर्व पिकांचे नुकसान अटळ मानले जात आहे. शेकडो एकर भातपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तालुकानिहाय पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये)

देवगड ७१, मालवण ९१.४, सावंतवाडी ९४.८, वेंगुर्ला ११६.८, कणकवली ३२.२, कुडाळ ८७.८, वैभववाडी ३९.६, दोडामार्ग ७६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT