Maharashtra Rain : कोकण, मध्य महाराष्ट्रात जोर कायम राहणार

Rain Update : मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा (रेड अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon
Published on
Updated on

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीची वाटचाल सुरू असतानाच राज्यात परतीचा पाऊस सक्रिय झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २५) पावसाचा जोर कायम राहणार असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा (रेड अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भात उन्हाचा चटका कायम असून, पावसाची उघडीप असलेल्या भागात कमाल तापमानातील वाढ कायम आहे. मंगळवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उन्हाचा चटका उकाडा कायम असतानाच, दुपारनंतर जोरदार वादळी वारे, विजांसह वळीव स्वरूपाचा पावसाने हजेरी लावली आहे.

Weather Update
Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी विजांसह जोरदार पाऊस

आज (ता. २५) राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून, कोकणातील रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज असल्याने अतिदक्षतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, वर्धा जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

Weather Update
Pune Rain : पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

मॉन्सूनची परतीची वाटचाल सुरूच

परतीचा प्रवास सुरूच असल्याने मंगळवारी (ता. २४) राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागासह पंजाब आणि हरियानाच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे. फिरोजपूर, सिरसा, चुरू, अजमेर, माऊंट आबू, दीसा, सुरेंद्रनगर ते जुनागडपर्यंत मॉन्सूनची परतीची सीमा आहे. उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

बुधवारी (ता. २५) राज्यातील पावसाचा अंदाज दर्शविणारा नकाशा. (स्रोत : हवामान विभाग)

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

रायगड, पुणे.

अतिजोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, वर्धा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदुरबार, धुळे, जळगाव, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली.

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

धाराशिव, लातूर, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com