Weekly Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार

Monsoon Rain : सोमवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे.

अमोल कुटे

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वाटचाल अडखळली असल्याने राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यात ढगाळ हवामानासह वादळी पाऊस पडत असून, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. आज (ता. १८) कोकण आणि पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

सोमवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात ढगाळ हवामान असून, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. विदर्भात अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. मॉन्सून दाखल झालेल्या भागातही पाऊस ओसरला आहे.

पावसाअभावी विदर्भात कमाल तापमान चाळीशीपार असून, सोमवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील भंडारा येथे राज्यातील उच्चांकी ४१.२ अंश तापमानाची नोंद झाली. भंडारा, ब्रह्मपूरी, वर्धा येथे पारा ४० अंशांपार आहे. आज (ता. १८) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनची प्रगती थांबली

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण कोकण, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मजल मारली आहे. बुधवारी (ता. १२) विदर्भात वाटचाल करताना अमरावती आणि चंद्रपूर पर्यंतच्या भागापर्यंत धाव घेतली आहे. त्यानंतर मात्र मॉन्सूनची चाल थांबली असून, सोमवारी (ता. १७) मॉन्सूनची कोणतीही प्रगती झालेली नाही.

सोमवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) :

कोकण :

सावंतवाडी ७०, वैभववाडी ६०, कणकवली, कुडाळ प्रत्येकी ५, मालवण ४०, दोडामार्ग, मुलदे, तळा, म्हसळा, दापोली प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र :

पाडेगाव ५०, शाहूवाडी, सिन्नर, देवळा प्रत्येकी ३०, पारनेर, खंडाळा बावडा, पाथर्डी २०.

मराठवाडा :

परभणी ८०, माजलगाव, परळी वैजनाथ, नायगाव खैरगाव प्रत्येकी ६०, अहमदपूर, गंगाखेड, मानवत प्रत्येकी ५०, धालेगाव, सोनपेठ, जळकोट प्रत्येकी ४०, पातूर, चाकूर, नांदेड, मुखेड, केज प्रत्येकी ३०, उदगीर, हिमायतनगर, धर्माबाद, शिरूर कासार, पालम, पुर्णा प्रत्येकी २०.

विदर्भ :

मालेगाव ४०, देऊळगाव राजा, गोंड पिंपरी, वणी, झरीझामनी, दिग्रस, मारेगाव, वार्शीटाकळी प्रत्येकी २०.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा.

वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT