Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : राज्यात वाढणार पावसाचा जोर

Rain Forecast : ऑक्टोबर हीट’चा चटका वाढल्यानंतर राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळी वातावरणामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News : ‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढल्यानंतर राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळी वातावरणामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. आज (ता. १०) राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने राज्यात सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. ५) महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेल्या नंदूरबार जिल्ह्याच्या काही भागांतून माघार घेतली आहे. त्यानंतर मात्र मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे. महाराष्ट्राच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान होत आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच सांताक्रूझ ३६.४ अंश, तर जळगाव येथे ३५.४ आणि डहाणू येथे ३५ अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. १०) राज्यात वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदवलेले कमाल तापमान : पुणे ३२.७, जळगाव ३५.४, कोल्हापूर ३१.२, महाबळेश्वर २७.२, मालेगाव ३२.४, नाशिक ३३.५, निफाड ३२.६, सांगली ३२.३, सातारा ३२.२, सोलापूर ३३.२, सांताक्रूझ ३६.४, डहाणू ३५.०, रत्नागिरी ३२.३, छत्रपती संभाजीनगर ३३.२, बीड ३२.०, परभणी ३३.२, अकोला ३६.८, अमरावती ३४.६, भंडारा ३२.०, बुलडाणा ३१.६, चंद्रपूर ३२.०, गडचिरोली ३२.६, गोंदिया ३२.९, नागपूर ३३.३, वर्धा ३४.१, वाशीम ३१.६, यवतमाळ ३४.०.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा

लक्षद्वीप बेटसमूह आणि लगतच्या अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात बुधवारी (ता. ९) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढण्याचे संकेत वर्तविले आहेत. उत्तर कोकणापासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

विजांसह जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.

३५ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे

अकोला ३६.८, सांताक्रूझ ३६.४, जळगाव ३५.४, डहाणू ३५.०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT