Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार

IMD Forecast : पूर्व विदर्भात दमदार हजेरी लावल्यानंतर राज्यात पाऊस ओसरला आहे. आज (ता. १२) विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Pune News : पूर्व विदर्भात दमदार हजेरी लावल्यानंतर राज्यात पाऊस ओसरला आहे. आज (ता. १२) विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींची शक्यता आहे.

दक्षिण झारखंड आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, देवमाली, हमीरपूर दाल्तोंगज, जमशेपूर, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेश, ते झारखंडपर्यंत हवेचा आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा देखील विरून गेला. त्यामुळे राज्यात पाऊस ओसरला आहे. शुक्रवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.३ अंश तापमानाची नोंदले गेले.

आज (ता. १२) उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, विदर्भातील अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडीपीसह हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शुक्रवारी (ता. ११) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२९.२---२१.९

अहिल्यानगर---३१.०---२१.३

‎‎धुळे---३१.०---२०.४

जळगाव---३०.४---२४.०

जेऊर---३३.०---१९.०

‎‎कोल्हापूर---२७.७---२२.६

‎महाबळेश्‍वर---२०.३---१७.८

मालेगाव---३१.०---२२.२

‎‎नाशिक---२९.२---२२.३

‎निफाड---२९.९---२१.५

‎सांगली---२९.९---२१.९

‎सातारा---२९.२---२२.५

‎सोलापूर---३३.३---२२.६

‎सांताक्रूझ---३१.८---२७.४

डहाणू---३२.५---२५.६

‎रत्नागिरी---३०.७---२६.८

‎छत्रपती संभाजीनगर---३१.७---२२.४

‎धाराशिव---२८.२---२०.८

‎परभणी---३१.४---२४.३

परभणी (कृषी)---३१.०---निरंक

‎‎अकोला---२८.९---२४.६

अमरावती---२७.६---२२.७

‎भंडारा---३०.०---२२.०‎‎

बुलडाणा---२७.०---२२.८

‎ब्रह्मपुरी---३०.०---२४.७

‎चंद्रपूर---२७.४---२३.६

‎गडचिरोली---२८.०---२३.२

‎गोंदिया---३१.४---२४.६

‎नागपूर---३०.६---२४.६

‎वर्धा---२९.२---२४.५

‎वाशीम---२९.०---२२.०

‎यवतमाळ---२७.४---२२.०

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weekly Weather: हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Eknath Shinde: दरडीप्रवण भागातील कुटुंबांचे पुनर्वसन करणार : एकनाथ शिंदे

Sugarcane Workers Welfare: ऊसतोड मजुरांच्या आरोग्य समस्येवर ‘साथी’चा इलाज

National Jowar Varieties: रब्बी ज्वारीचे दोन सुधारित वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित

Fruit Orchard Cultivation: फळबाग लागवडीला बारामती उपविभागात गती

SCROLL FOR NEXT