Pune News: देशातील सर्वाधिक धरणे असूनही राज्याने मागणी व पुरवठ्यावर आधारित पाण्याची ताळेबंद पद्धत स्वीकारली नाही. मात्र जलनियोजनाकडे आणखी दुर्लक्ष झाल्यास २०३१ नंतर राज्य भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर उभे असेल, असा इशारा अभ्यासकांनी दिला आहे. .‘वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट’ व पुणे श्रमिक पत्रकार संघाने संयुक्तपणे गुरुवारी (ता. ५) घेतलेल्या माध्यम कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली. व्यासपीठावर ट्रस्टचे राज्य प्रमुख हेमंत पिंजण, विशेषज्ञ सफदर अली, प्रकल्प व्यवस्थापक तिलकचंद कटरे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील व सरचिटणीस मंगेश फल्ले होते..Water Management: आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाकडे वळणे गरजेचे.भूपृष्ठावरील पाणी उपलब्धता देशात २३०० तर राज्यात १८१ बिलियन क्युबिक मीटर आहे. शेती सिंचनासाठी उपलब्ध पाण्यापैकी देशात ८३ टक्के, तर राज्यात ६७ टक्के पाणी वापरले जाते. मात्र पुरवठा, गरज, मागणी व वापर याचा ताळेबंद मांडला जात नाही. त्यामुळे सिंचन केवळ १९ टक्के दिसते आहे. कमी सिंचनातून कृषी विकासात अडथळे येत आहेत. दुसरीकडे पाणी उपशाचे नियोजन नाही. त्यामुळे ते घटते आहे, असे या वेळी सांगण्यात आले..राज्यात भूपृष्ठ व भूगर्भ अशा दोन्ही स्रोतांचे जलनियोजन अर्धवट झाले आहे. त्यामुळे सिंचन व्यवस्था विस्कळीत झाली व जलपुरवठ्यात विषमता आली आहे. शहरीकरणामुळे मागणी अजून वाढेल. परिणामी, शेतीसिंचनासमोरील संकट अजून गडद होऊ शकते. राज्यात सिंचनासाठी सध्याची पाणी मागणी ७८ क्युबिक बिलियन मीटर इतकी आहे. परंतु, ही मागणी २०३१ मध्ये ९५ बिलियन क्युबिक मीटरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जलनियोजन न केल्यास कृषी व्यवस्थेला भीषण टंचाईचा सामना करावा लागेल, असा निष्कर्ष कार्यशाळेत काढला गेला..Water Management: धरण आंधळे अन् पाट पांगळे.श्री. पिंजण म्हणाले, ‘‘पाण्याची उपलब्धता नसल्यास स्वच्छतेशी निगडीत सर्व समस्या वाढतील. सरकारी पातळीवर जलनियोजनासाठी उपाययोजना चालू आहेत. मात्र सर्व उपाय पाणीसाठा वाढविण्यासंबंधी आहेत. ताळेबंधाकडे दुर्लक्ष झाले आहे.’’.केवळ संख्येवर यश मोजलेजलनियोजन व स्वच्छतेची सांगड घालणाऱ्या राष्ट्रीय सरकारी धोरणाची वाटचाल श्री. अली यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘सरकारी अभियानांमधून देशभर शौचालये बांधली. पण, योजनेचे यश केवळ संख्येवर मोजले गेले. मात्र त्याचा वापर, देखभालीचे मुद्दे दुर्लक्षित राहिले. ’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.