Pune News: जुन्नर तालुक्यातील बेल्हे कृषी मंडळात ठिबक सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी उपकृषी अधिकारी प्रमिला मडके आणि मंडळ कृषी अधिकारी शिवकांत कोल्हे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली..उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी ठिबक सिंचन संचासाठी आलेल्या प्रस्तावांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर बनावट अर्ज असल्याचा संशय निर्माण झाला. त्यानंतर ४६१ प्रस्तावांची सखोल पडताळणी करण्यात आली. या तपासणीत तब्बल ३४८ प्रस्ताव बनावट असल्याचे समोर आले..Sugarcane Drip Irrigation: उसासाठी ठिबक सिंचन निवडताना कोणते निकष पाळावेत?.या बनावट प्रस्तावांमध्ये बनावट देयके, फोटो आणि तपासणी अहवाल महाडीबीटी संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले होते. या प्रस्तावांना मंजुरी मिळाली असती तर शासनाला २ कोटी ८६ लाख रुपयांचा फटका बसला असता. मात्र वेळेत कारवाई झाल्याने ही रक्कम वाचली आहे..तपासणीदरम्यान १५ बनावट शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ लाख ८८ हजार रुपये अनुदान जमा झाल्याचे आढळले. उपविभागीय कृषी अधिकारी शिरसाठ यांनी वसुलीचे आदेश दिल्यानंतर ही रक्कम परत मिळवण्यात आली. उर्वरित ३३३ प्रस्तावांपैकी २ कोटी ८१ लाखांचे अनुदान अद्याप वितरित झाले नव्हते. हे प्रस्ताव महाडीबीटी पोर्टलवरून हटवण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाकडे पाठवण्यात आला आहे..Sugarcane Drip Irrigation: उसासाठी ठिबक सिंचन संचाची निवड .दरम्यान, बनावट बिले सादर करणे आणि नोटिशींना उत्तर न देणे या कारणांमुळे तुळजाई इरिगेशन (बोरी बुद्रुक), ओम साई ॲग्रो एजन्सी (बेल्हे) आणि श्रीनाथ इरिगेशन (बेल्हे) या तीन विक्रेत्यांची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर बेल्हे येथील उपकृषी अधिकारी प्रमिला मडके आणि मंडळ कृषी अधिकारी शिवकांत कोल्हे यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी सांगितले..जिल्ह्यातील जुन्नर भागात ठिबक सिंचन अनुदानात एका ठिकाणी गैरप्रकार आढळले. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय या भागातील तीन दुकानदारांनाही वितरक नोंदणी करारातील अटी व शर्तींचे पालन न केल्यामुळे ठिबक व तुषार सिंचनाचे संच विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत.- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.