Ahilyanagar News: दैठणे गुंजाळ (ता. पारनेर), भाळवणी व हिवरेबाजार (ता. अहिल्यानगर) येथील ३१ दुभत्या गाईंच्या मृत्यूचे कारण अखेर स्पष्ट झाले आहे. गाई़च्या आहारात कोरड्या चाऱ्याचा अभाव आणि दूधवाढीसाठी दिल्या जाणाऱ्या पशुखाद्यातील प्रथिनांचे (हाय प्रोटीन) प्रमाण जास्त असल्यामुळे अल्कली अपचनाचे (रुमेन अल्कोसिस) प्रमाण वाढले. तसेच ऋतु बदलाच्या काळात याचे तीव्र परिणाम दिसतात. .त्यामुळे अधिक दूध उत्पादन देणाऱ्या गाईंचा मृत्यू झाल्याचा अहवाल नागपूरच्या महाराष्ट्र पशुवैद्यक व मत्स्य विद्यापीठाच्या (माफसू) विशेष पथकाने दिला असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिली..Cow Health: हिवाळ्यात गाईंमध्ये आढळतात विविध आजार .मागील पंधरा दिवसांत या भागात सुमारे ३१ दुभत्या गाईंचा मृत्यू झाला होता. स्थानिक पशुवैद्यकीय पथकाने अवयव व रक्तनमुने तपासणीसाठी पाठवले; मात्र कारण स्पष्ट होत नव्हते. गाईंच्या मृत्यूमुळे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने पशुपालकांसह पशुवैद्यकीय विभागाचे पथकही हतबल झाले होते..पद्मश्री पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे संशोधनाची मागणी केल्यानंतर ‘माफसू’च्या शिरवळ (जि. सातारा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ पथकाने घटनास्थळी पाहणी करून रक्त, चारा व पशुखाद्य नमुने तपासले. पशूऔषधी शास्त्र विभागाचे डॉ. अंभोरे, पशूआजार विकृती विभागाचे डॉ. मोटे, सामूहिक आरोग्य विभागाचे डॉ. कोल्हे, सूक्ष्म जीवशास्ज्ञ विभागाचे डॉ. म्हसे यांचे पथक आले होते. यासाठी त्यांनी ‘माफसू’चे माजी विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने यांचेही मार्गदर्शन घेतले..Cow Deaths: हिवरेबाजार, दैठणे गुंजाळमध्ये बारा दिवसांत २१ गाई दगावल्या.अहवालानुसार, पशुखाद्यातील प्रथिनांचे प्रमाण त्या-त्या वेळीच्या वातावरणानुसार ११ ते २० टक्क्यांपर्यंत अपेक्षित आहे, मात्र संबंधित गाईला खाऊ घातलेल्या पशुखाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण सुमारे २५ टक्के आढळले. काही ठिकाणी चाऱ्यात युरियाचे प्रमाणही जास्त होते. या पार्श्वभूमीवर अल्कली अपचन होऊन प्रतिकारशक्ती कमी असलेल्या गाई दगावल्याचे स्पष्ट झाले. उपचारानंतर मागील तीन दिवसांपासून मृत्यूची मालिका थांबली असून, एकूण ३१ गाई दगावल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी दिली..दूध वाढीसाठी दिल्या जाणाऱ्या प्रथिनांचा शिफारशीपेक्षा अतिरेकी वापर टाळावा. संतुलित प्रथिने, तंतुमय व स्निग्ध पदार्थ, क्षारांचे मिश्रण यांचा समतोल आहार द्यावा. भरपूर स्वच्छ पाणी पाजावे. बुरशी लागलेला किंवा काळवंडलेला मुरघास देऊ नये.- डॉ. उमेश पाटील, पशुसंवर्धन उपायुक्त, अहिल्यानगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.