Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : राज्यात उद्या पावसाचा जोर वाढणार ; मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात पावसाचा अंदाज

Rain Forecast : मात्र उद्यापासून राज्याच्या अनके भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी कायम आहे. पण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात आजही पावसाची उघडीप होती. मात्र उद्यापासून राज्याच्या अनके भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उद्या हवामान विभागाने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.

नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार तसेच कोल्हापूर जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला. पुणे आणि सातारा जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर कोकणातील पालघर आणि मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

रविवारी आणि सोमवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकणातही रविवारी आणि सोमवारी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT