Maharashtra Rain : घाटमाथ्यावर पावसाचा जोर

Weather Update : राज्यातील पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत दावडी घाटमाथ्यावर सर्वाधिक १२४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत दावडी घाटमाथ्यावर सर्वाधिक १२४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या.

मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला आहे. नाशिकमधील इगतपुरी येथे ५३ मिलिमीटर, पुणे जिल्ह्यातील वेल्हा येथे ९७ मिलिमीटर, तर माले, मुठे ३२, भोलावडे, निगुडघर ३१, कार्ला ६५, लोणावळा ४८, पानशेत ३५, विंझर ४२ मिलिमीटर, साताऱ्यातील लामज येथे ५० मिलिमीटर, सांगलीतील चरण येथे ३१ मिलिमीटर पाऊस झाला. कोल्हापुरातील आंबा येथे ९४ मिलिमीटर, तर करंजफेन ३१, मलकापूर ३५, राधानगरी ३२, गगनबावडा ३० मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित भागात ढगाळ वातावरण असून अधूनमधून शिडकावा होत आहे. तर अनेक ठिकाणी पावसाची उघडीप होती. घाटमाथ्यावरही जोर वाढला असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वदूर हलका ते मध्यम सरी बरसल्या. तर ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यात कमीअधिक पाऊस पडला. ठाणेतील ठाणे शहर येथे ४१ मिलिमीटर, तर मुंब्रा ३१ मिलिमीटर, पालघरमधील डहाणू, मालयण, कसा, खोढला, तलवड येथे ३२ मिलिमीटर, तर तलसरी ३१ मिलिमीटर पाऊस झाला. सिंधुदुर्गमधील भुईबावडा येथे ३० मिलिमीटर पाऊस झाला.

Rain Update
Vidarbha Rain : विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

मराठवाड्यात पाऊस नसल्याने शेतातील पाणी कमी होऊ लागले असून पिके वाफसा स्थितीत येऊ लागली आहेत. मात्र, तीन ते चार दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी पिंपळवाडी, लोहगाव येथे तुरळक सरी पडल्या. बीडमधील वाडवणी येथे २० मिलिमीटर, लातूरमधील वडवळ, झरी, पानगाव, कारेपूर येथे तुरळक सरी पडल्या. नांदेडमधील मोघाळी येथे २६ मिलिमीटर, तर मुदखेड २१, बारड २९, अर्धापूर ३३ मिलिमीटर, तर कुंटूर, नायगाव, दाभड, तरोडा, मुगट येथे हलक्या सरी कोसळल्या. हिंगोलीतील डोंगरकड, हट्टा, कुरुंदा, येहळेगाव, सेनगाव, पानकनेरगाव तुरळक पाऊस झाला.

Rain Update
Maharashtra Rain : राज्यातील अनेक भागांत पावसाची उघडीप

विदर्भातील काही ठिकाणी हलक्या पडत आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, पंचगव्हाण, पळसो येथे तुरळक सरी बरसत आहे. अमरावतीतील धारणी येथे २४ मिलिमीटर, तर सेमडोह, मंगरूळ, धानोरा, माहुली, अचलपूर येथे हलक्या सरी पडल्या. यवतमाळमधील भलार येथे ३३ मिलिमीटर, तर पुनवट, शिरपूर ३१, वणी, शिंदोळा २०, राजूर १९, मारेगाव २१ मिलिमीटर, तर कोपरा, सावर, माणिकवाडा, वाटफळी तुरळक, वर्धातील मंडगाव येथे ५० मिलिमीटर, तर हिंगणी २४, हिंगणघाट २२, वाघोली २१, सावळी, झाडसी, केळझरमध्ये हलक्या सरी पडल्या. नागपूरमधील बिशनूर ५५ मिलिमीटर, तर रिधोरा २४, मेटपांझरा २२, मोवाड २७ मिलिमीटर, तर कोंढळी, परडसिंगा, कामठी, काटोल, येनवा, नरखेड, जलालखेडा, सावरगाव, मेंधळा हलक्या सरी पडल्या. भंडाऱ्यातील लाखनी येथे २१ मिलिमीटर, गोंदियातील सौदाद येथे ५० मिलिमीटर, तर रत्नारा २२, कामठा २१, काट्टीपूर २६, मुल्ला २०, देवरी ३९ मिलिमीटर, सिंदबिरी, रावणवाडी हलक्या सरी बरसल्या. चंद्रपूरातील घुगस येथे ३१ मिलिमीटर, तरपोंभुर्णा ३० मिलिमीटर, तर मूल, चिखली, तेमुर्डा, खांबडा, चिकणी, नावरगाव हलक्या, गडचिरोलीतील बामणी येथे ५१ मिलिमीटर, तर असारळी ३०, भामरागड २८, गाट्टा २१, कोर्ची २३ मिलिमीटर, तर तरडगाव, पोरळा, सिरोंचा, कासंसूर, लागम, बेडगावात हलका पाऊस झाला.

गुरुवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये - (स्रोत : कृषी विभाग)

कोकण : पनवेल, ओवले, कर्नाळा, रोहा ३६, मोराबी पवयंजे, ६१, कर्जत ३४, चौक, पाली, जांभूळपाडा, कोलाड ३७, खोपोली ३५, आटोने ३३, पेण, कामरली ३१, महाड, नाटे, तुडील ७५, बिरवडी ८२, करंजवडी ५७, खारवली ६२, माणगाव ४३, इंदापूर ३५, गोरेगाव, लोणेरे ७७, निजामपूर ३५, पोलादपूर, कोंडवी, वाकण ५७, म्हसला, खामगाव ६३, तळा ५३, मेंढा ३६, चिपळूण ५४, खेर्डी ४३, मार्गताम्हाणे ७८, रामपूर ४५, वहाळ ६८, सावर्डे ५७, असुर्डे ६७, कळकवणे ८४, शिरगांव ७०, दापोली ३२, बुरोंडी ५०, पालगड ३०, वेळवी ३२, शिर्शी ५०, आंबवली ४०, कुळवंडी ७६, भरणे ४२, दाभीळ ५०, धामणंद ४३, गुहागर ८५, आबलोली ५१, मंडणगड ४५, म्हाप्रळ, देव्हारे ३७, रत्नागिरी ४७, खेडशी ५८, फसोप ५१, कोतवडे ५८, मालगुंड ५९, तरवल ८३, पाली ५८, कडवी ५५, मुरडव, माखजन ७०, फुंणगुस, फणसवणे ५५, आंगवली ४७, कोंडगाव ७४, देवरुख ४४, तुळसानी ५४, माभळ ४८, तेर्ये ५५, सौंदळ ६२, भांबेड ७९, ओणी, लांजा, पुनस, विलवडे ६७, पाचल ४२.

या घाटमाथ्यावर पडला सर्वाधिक पाऊस :

घाटमाथा पाऊस

दावडी १२४

डुंगरवाडी १२१

ताम्हिणी ११२

भिरा १०६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com