Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Weather Forecast : थंडीची चाहूल, चटकाही कायम

Maharashtra Weather Update : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. पहाटेच्या वेळी किमान तापमानात घट होत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. पहाटेच्या वेळी किमान तापमानात घट होत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे. तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्र, धुळे येथील कृषी महाविद्यालयात किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या खाली घसरला आहे. तर सांताक्रुझ येथे उच्चांकी ३६.२ अंश तापमानाची नोंद होत आहे.

मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. ढगाळ हवामान निवळताच स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने विदर्भ आणि कोकणात उन्हाची ताप अधिक आहे. तर कोकण वगळता उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा २० अंशांच्या खाली येऊ लागला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल-किमान तापमानातील तफावत वाढली आहे.

बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझसह डहाणू, अकोला, रत्नागिरी येथे कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे आहे. तसेच धुळे येथील कृषी महाविद्यालयात १४.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर निफाड येथील गहु संशोधन केंद्रात १४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. जळगाव, नाशिक, महाबळेश्वर येथे किमान तापमान १६ अंश व त्यापेक्षा खाली आले आहे. आज (ता. ७) तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. ६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल आणि किमान तापमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.७ (१७.०), अहिल्यानगर ३१.९ (१६.३), धुळे ३३ (१४.४) जळगाव (१६.०), कोल्हापूर ३०.५ (२०.३), महाबळेश्वर २५.३ (१५.६), मालेगाव (१७.२), नाशिक ३२.३ (१६.०), निफाड ३१.८ (१४.८), सांगली (१९.०), सातारा ३१.६ (१७.५), सोलापूर ३४.८ (२१.९), सांताक्रूझ ३६.२ (२२.३), डहाणू ३५.५ (२२.०), रत्नागिरी ३५.२ (२२.६), छत्रपती संभाजीनगर ३३.२ (१८.१), नांदेड (१८.८), धाराशिव ३१.० (१८.४), परभणी (१८.८), अकोला ३५.५ (१९.६), अमरावती ३४.८ (१९.३), भंडारा ३३.० (१८.१), बुलडाणा ३१.६ (१८.५), ब्रह्मपुरी ३४.३ (१८.९), चंद्रपूर ३३.८ (१८.८), गडचिरोली ३३.४ (१८.८), गोंदिया ३२.८ (१७.५), नागपूर ३३.५ (१८.९), वर्धा ३३.९ (२०.०), वाशीम ३४.६, यवतमाळ ३३.५ (१८.५).

३५ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : सांताक्रूझ ३६.२, डहाणू ३५.५, अकोला ३५.५, रत्नागिरी ३५.२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT