Heat Wave Agrowon
हवामान

Summer Heat : उन्हाचा चटका आणि झळा तापदायक

Maharashtra Weather Update : राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. मात्र उन्हाचा चटका कायम असलेल्या भागात उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत.

Team Agrowon

Weather News Pune : राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. मात्र उन्हाचा चटका कायम असलेल्या भागात उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २५) उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बुधवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४३.५ तापमानाची नोंद झाली. वर्धा येथे ४३ अंश सेल्सिअस तर चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, अमरावती, ब्रह्मपुरी, वाशीम, जळगाव, सोलापूर येथे कमाल तापमान ४२ अंशांच्या पुढे आहे.

कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान ३६ ते ४२ अंशांच्या दरम्यान आहे. पावसाला पोषक हवामान होताच, राज्याच्या कमाल तापमानात चढ - उतार होत असून, कोकणासह राज्यात उष्ण व दमट हवामानामुळे घामटा निघत आहे.

झारखंड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर प्रदेशपासून बिहारपर्यंत, तसेच मध्य प्रदेशपासून विदर्भ ते कर्नाटकपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आज (ता. २४) राज्यात चटका कायम राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बुधवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ४०.१ (२३.७), जळगाव ४२ (२७.३), धुळे ४१, कोल्हापूर ३६.३ (२३.५), महाबळेश्‍वर ३३.४ (१८.४), नाशिक ३७.३ (२३.७),

निफाड ३९ (२५), सांगली ३८.४ (२४), सातारा ४०.१ (२३), सोलापूर ४२.६ (२६.५), सांताक्रूझ ३४.२ (२७.८), डहाणू ३३.९ (२९.१), रत्नागिरी ३४.१ (२६.५),

छत्रपती संभाजीनगर ४०.६(२४.२), नांदेड ४१.४ (२९), परभणी ४१.३ (२७.४), अकोला ४३.५ (२८), अमरावती ४२.२ (२६.१), बुलडाणा ४१ (२६.६), ब्रह्मपुरी ४२.२ (२६),

चंद्रपूर ४२.८(२७.४), गोंदिया ४१.५ (२४.८), नागपूर ४२.३ (२५.५), वर्धा ४३ (२८), वाशीम ४२.२(२६) यवतमाळ ४२.५(२७).

मॉन्सूनची वाटचाल अडखळली

नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शुक्रवारी (ता. १९) दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल झाले. त्यानंतर मॉन्सूनची पुढील वाटचाल अडखळली आहे. बुधवारी (ता. २४) मॉन्सूनच्या वाटचालीत कोणतीही प्रगती झाली नाही. दोन दिवसांत दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान बेटांच्या आणखी काही भागांत मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Death: अधिकाऱ्यांच्या धमकीनंतर शेतकऱ्याची आत्महत्या

Narendra Modi 75th Birthday: पंतप्रधान मोदींना देश-परदेशांतून शुभेच्छा

Agriculture Development: ‘शेतीमाल निर्यात सुविधा केंद्र सक्षम करा’

Tractor Sales: ट्रॅक्टर विक्रीला माॅन्सूनचा ‘बूस्ट’

Sugar Commissioner Transfer: साखर आयुक्त पदाचा संगीत खुर्चीचा खेळ

SCROLL FOR NEXT