डॉ. ए. व्ही. गजाकोस, डॉ. एस. एच. ठाकरे, डॉ. डी. एस. कराळे Smart Farming: भारतामध्ये लसूण हे एक महत्त्वाचे मसालावर्गीय पीक आहे. त्यातील आयुर्वेदिक औषधी मूल्ये, प्रतिजैविक गुणधर्म आणि औषध निर्मितीतील वाढता वापर यामुळे लसणाची देश-विदेशांत मागणी वाढत आहे. परिणामी लसूण उत्पादन आणि निर्यातीमध्येही वाढ झालेली दिसून येते. मात्र लसूण लागवड ही मनुष्यबळावर आधारीत असल्यामुळे अडचणी येत आहेत. लसणाची लागवडीसाठी मेहनतीसोबतच कार्य कौशल्याची आवश्यकता असते. .त्याच प्रमाणे लागवडीसाठी वेळही अधिक लागतो. बियाण्याचा अपव्यय होण्याचाही धोका असतो. या पारंपरिक अडचणी दूर करण्याचा उद्देश ठेवून अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी शक्ती व अवजारे विभागाने ‘ट्रॅक्टरचलित पी.डी.के.व्ही. लसूण टोकण यंत्र’ विकसित केले आहे. या यंत्रामुळे लसूण उत्पादनात श्रम बचत, खर्च बचत आणि उत्पादनवाढ साधणार आहे..Garlic Farming: लसूण पिकाच्या विविध जाती.लसूण लागवडीतील समस्या आणि बदलाची गरजलसूण लागवड ही प्रामुख्याने बियाणे हाताने टोकण करून केली जात असे. एका हेक्टर क्षेत्रावर लसूण पेरण्यासाठी साधारण ३० ते ४० मजूर-दिवस लागतात. पेरणी करताना समांतर अंतर राखणे, पंक्ती एकसंध ठेवणे आणि प्रत्येक पाकळी योग्य खोलीवर पडेल, याची काळजी घ्यावी लागते. अन्यथा, बियाण्याचा अपव्यय, उगवण कमी होणे, पिकाची असमान वाढ यांचा अंतिम परिणाम हा उत्पादनातील घटीमध्ये होतो. त्यामुळे लसणासाठी अचूक, जलद आणि श्रम बचत करणाऱ्या यंत्राचा विकास करण्याची आवश्यकता होती. ती लक्षात घेऊन काम करण्यात आले..लसूण टोकण यंत्राची रचनापी.डी.के.व्ही. लसूण टोकण यंत्र हे ट्रॅक्टरचलित असून, १० ओळींमध्ये काम करत जाते. गादीवाफ्यावर (रेज बेड) वेगाने व अचूक पेरणी करणारे हे यंत्र चालविण्यासाठी किमान ३५ एचपीचा ट्रॅक्टर आवश्यक असतो. या यंत्रामध्ये लसूण पाकळ्या ठेवण्यासाठी स्वतंत्र हॉपर्स, ओळीनिहाय पेरणी यंत्रणा, खोली नियंत्रण आणि दोन ओळींतील अंतर नियंत्रण व्यवस्था इ. ची समावेश होतो..सध्या १० दातांचे यंत्र उपलब्ध आहे. या दातांमधील अंतर आपण गरजेनुसार कमी जास्त करू शकतो. त्यातून दोन ओळींमधील अंतर निश्चित व समान ठेवले जाते.या यंत्रामध्ये बियाणे (लसूण पाकळ्या) ठेवण्यासाठी पेटी दिलेली आहे. वरील पेटीमधून पाकळ्या खाली दिलेल्या पेटीमध्ये येतात. त्यामध्ये कपाद्वारे एकेक लसूण पाकळी उचलली जाऊन जमिनीत पेरली जाते. यामुळे दोन लसूण पाकळ्यांतील अंतर समान ठेवले जाते. या लसूण टोकण यंत्रास जमिनीवर चालणाऱ्या चाकाद्वारे गती दिली जाते..Agriculture Technology: शाश्वत शेतीसाठी थर्मल सेन्सर्स.गादीवाफ्यांच्या निर्मितीसाठी दोन सारायंत्र दिलेले आहेत, त्यामुळे १० ओळींनंतर एक वाफा तयार होतो. या मध्ये असलेल्या सरीमधून पिकाची आंतरमशागत व अन्य कामे करणे सोपे होते.लसूण पाकळ्या पेरल्या गेल्यानंतर त्या मातीने झाकण्याकरिता यंत्रामागे स्वतंत्र लोखंडी पास दिलेली आहे..कार्यक्षमताप्रति तास ०.४० हेक्टर क्षेत्रावर पेरणी करता येते. परिणामी मनुष्यबळात प्रचंड बचत होते.यंत्राद्वारे टोकण केल्यास हेक्टरी केवळ ६७६ किलो बियाणे पुरेसे होते. ही बियाण्यांमध्ये २० ते ३० टक्के बचत होते..पीक वाढीसाठी महत्त्वाचे यंत्र?यंत्राद्वारे प्रत्येक पाकळी ही योग्य अंतरावर, समांतर ओळींत, आणि निश्चित खोलीवर टाकली जाते. ही अचूकता सर्वत्र टिकून राहत असल्याने पिकाची उगवण ८९ टक्क्यांपर्यंत होते. झाडांची वाढही एकसंध होऊन पुढील टप्प्यांतील खते देणे, तणनियंत्रण, सिंचन आदी कामे अधिक परिणामकारकरीत्या करता येतात. यंत्राद्वारे केलेल्या पेरणीमुळे २० ते ३० टक्क्यांपर्यंत बियाणे बचत आणि उत्पादनात वाढ या बाबी साधल्या गेल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. दोन ओळी सोबतच दोन रोपांत अंतर योग्य राहत असल्याने आंतरमशागतीची कामेही करणे शक्य होते. त्यातून पीक वाढीला अनुकूल परिस्थिती तयार करते..खर्चातील बचतपारंपरिक पद्धतीपेक्षा या यंत्राद्वारे केलेल्या लसूण लागवडीच्या एकूण खर्चात ७८ टक्क्यांपर्यंत बचत झाल्याचे दिसून आले. मजुरी खर्चात बचत होते. कामाचा वेग वाढून कमी वेळात काम पूर्ण होते. पिकाची एकसमान वाढ होते. दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते.- डॉ. ए. व्ही. गजाकोस, ७०५७२०८४०२(कृषी शक्ती व अवजारे विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.