Heat Wave Agrowon
हवामान

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Summer Heat : सूर्य तळपल्याने उन्हाचा चटका वाढून राज्य होरपळे आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४३ अंशांपार गेला आहे.

अमोल कुटे

Pune News : सूर्य तळपल्याने उन्हाचा चटका वाढून राज्य होरपळे आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४३ अंशांपार गेला आहे. अकोला येथे राज्याचे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४४.३ अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. ६) विदर्भातील अकोला येथे उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

मराठवाडा आणि आसपासच्या परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, मराठवाड्यापासून ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्यात उकाडा कायम असून, वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्याचे हंगामातील उच्चांकी ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उन्हाचा चटका वाढल्याने मध्य महाराष्ट्रातील जेऊर येथे ४४ अंश तापमान नोंदले गेले. अमरावती, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, गडचिरोली, वर्धा, वाशीम, परभणी, नांदेड, बीड, सोलापूर येथे ४३ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

आज (ता. ६) विदर्भातील अकोला येथे उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३९.६, धुळे ४२, जळगाव ४२.३, जेऊर ४४, कोल्हापूर ३८.८, महाबळेश्‍वर ३२.७, मालेगाव ४२.८, नाशिक ३८.५, निफाड ३९.२, सांगली ४१.६, सातारा ४०.९, सोलापूर ४३.४, सांताक्रूझ ३३.७, डहाणू ३५.८, रत्नागिरी ३३,

छत्रपती संभाजीनगर ४१.६, बीड ४३.१, नांदेड ४३.२, परभणी ४३.६, अकोला ४४.३, अमरावती ४३.८, बुलडाणा ४०, ब्रह्मपुरी ४३.७, चंद्रपूर ४३.८, गडचिरोली ४३, गोंदिया ४०.४, नागपूर ४१.५, वर्धा ४३, वाशीम ४३, यवतमाळ ४२.२.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

अकोला.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया.

४३ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ४४.३, जेऊर ४४, अमरावती ४३.८, चंद्रपूर ४३.८, ब्रह्मपुरी ४३.७, परभणी ४३.६, सोलापूर ४३.४, नांदेड ४३.२, बीड ४३.१, गडचिरोली ४३, वर्धा ४३, वाशीम ४३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT